थर्टी फर्स्टसाठी बॉलीवूडचे कलाकार परदेशात

सिनेमाच्या शुटींगमध्ये व्यस्त असणारे कलाकार कधी तरी थोडा वेळ कुंटुंबाला किंवा जोडीदाराला देता यावा आणि मज्जा करता यावी यासाठी थोडा तरीवेळ काढतात.

Updated: Dec 30, 2015, 07:37 PM IST
थर्टी फर्स्टसाठी बॉलीवूडचे कलाकार परदेशात

मुंबई : सिनेमाच्या शुटींगमध्ये व्यस्त असणारे कलाकार कधी तरी थोडा वेळ कुंटुंबाला किंवा जोडीदाराला देता यावा आणि मज्जा करता यावी यासाठी थोडा तरीवेळ काढतात.

थर्टी फर्स्टच्या पार्टीसाठीही अनेक बॉलीवूडचे कलाकार परदेशात निघालेत. 

१. रणबीर कपूर आणि कॅटरिना कॅफ थर्टी फर्स्टसाठी मेक्सिको येथे जात आहेत.

२. रणवीर कपूर आणि दीपिका ही चर्चीत जोडीही युरोपमध्ये सेलिब्रेशनसाठी जाणार आहेत.

३. प्रियंका चोपडा आपल्या मैत्रींनीसोबत परदेशात निघाली आहे.

४. करिना कपूर तिचा पती सैफ अली खानसोबत स्विट्जरलँडला जाणार आहे.

५.अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चन पती अभिषेक आणि मुलगी आराध्या सोबत न्यूयार्क येथे नव्या वर्षाचं सेलिब्रेशन करणार आहे.

६. अभिनेत्री विद्या बालन पती सिद्धार्थ रॉय कपूर सोबत अगोदरच 10 दिवसाच्या सुट्ट्यांवर विदेशात गेली आहे. १ जानेवारीला तिचा वाढदिवस असल्याने त्याचं ही सेलिब्रेशन ती परदेशात करणार आहे. 

७. अभिनेत्री शिल्पा शेट्टी पती राज कुंद्रा आणि मुलासोबत लंडन येथे दाखल झाली आहे.

८.तमन्ना भाटिया ही नव्या वर्षाचं सेलिब्रेशन तिच्या आई-वडीलांसोबत उत्तर कॅरोलीना येथे करणार आहे.

९. फॅशन क्वीन सोनम कपूर मालदीव येथे थर्टी फर्स्टचं सेलिब्रेशन करणार आहे.