बॉक्स ऑफिस कलेक्शन : शिवाय विरुद्ध ऐ दिल है मुश्किल

एकाच दिवशी प्रदर्शित झालेल्या अजय देवगणचा 'शिवाय' आणि करण जोहर दिग्दर्शित 'ऐ दिल है मुश्किल' या सिनेमांमध्ये बॉक्स ऑफिसवर चांगलीच स्पर्धा बघायला मिळतेय. 

Updated: Nov 3, 2016, 02:43 PM IST
बॉक्स ऑफिस कलेक्शन : शिवाय विरुद्ध ऐ दिल है मुश्किल

मुंबई : एकाच दिवशी प्रदर्शित झालेल्या अजय देवगणचा 'शिवाय' आणि करण जोहर दिग्दर्शित 'ऐ दिल है मुश्किल' या सिनेमांमध्ये बॉक्स ऑफिसवर चांगलीच स्पर्धा बघायला मिळतेय. 

पहिल्या सहा दिवसांत शिवाय या सिनेमाने 64.36 कोटींची कमाई केलीय तर ऐ दिल है मुश्किलने सहा दिवसांत 74.01 कोटी कमावलेत.

ट्रेलर रिलीज झाल्यापासून वादग्रस्त ठरलेल्या ऐ दिल है मुश्किल सिनेमाने पहिल्या दिवशी 13.30 कोटींची कमाई केली होती. तर शिवायचे ओपनिंग10.24 कोटी इतके होते.