जिंदगी ना मिलेगी दोबाराच्या सगळ्या कलाकारांबरोबर असाही योगायोग

अभिनेता आणि दिग्दर्शक फरहान अख्तरनं आपली बायको अधुनासोबत घटस्पोट घ्यायचा निर्णय घेतला. 

Updated: Jan 23, 2016, 11:26 PM IST
जिंदगी ना मिलेगी दोबाराच्या सगळ्या कलाकारांबरोबर असाही योगायोग

मुंबई : अभिनेता आणि दिग्दर्शक फरहान अख्तरनं आपली बायको अधुनासोबत घटस्पोट घ्यायचा निर्णय घेतला. पण फरहानच्या या निर्णयामुळे एक अनोखा योगायोग जुळून आलाय.

 
फरहाननं ज्या जिंदगी ना मिलेगी दोबारामध्ये काम केलं, त्या चित्रपटातले सगळेच कलाकार आता सिंगल झालेत. या चित्रपटात हृतिक रोशन, अभय देवल, कतरिना कैफ, कल्की कोचलिन आणि फरहान अख्तरनं काम केलं होतं. तर फरहानची बहिण जोया अख्तरनं या चित्रपटाचं दिग्दर्शन केलं होतं. 
फरहानच्या आधी या चित्रपटात काम करणा-या बाकी सगळ्या कलाकारांचं आधीच ब्रेक अप झालं होतं, आणि आता फरहानचा घटस्फोट झाला, त्यामुळे याला योगायोगच म्हणावा लागेल.