काजोलने अजय देवगणबरोबर यासाठीच लग्न केलं...

 काजोलने आपल्या जीवनाविषयी एक रहस्य उलगडलेय. तिने अभिनेता अजय देवगण याच्याशी का लग्न केल याचे!

Updated: Jan 23, 2016, 05:21 PM IST
काजोलने अजय देवगणबरोबर यासाठीच लग्न केलं...

जयपूर : देशातील असहिष्णुतेवर सध्या चर्चा झडत आहे. मात्र, अभिनेत्री काजोलने याला जास्त महत्व दिले नाही. याबाबत एक अशी सीमा नाही, असे तिने म्हटलेय. त्याचवेळी तिने आपल्या जीवनाविषयी एक रहस्य उलगडलेय. तिने अभिनेता अजय देवगण याच्याशी का लग्न केल याचे!

पुस्तक वाचणाची आवड असणाऱ्या काजोलने शनिवारी जयपूर साहित्य संमेलनात लेखक अश्विन सांघी यांचे 'द सियालकोट सागा' या पुस्तकाचे प्रकाशन केले. यावेळी तिने आपल्या जीवनातील काही रहस्य उलगडले.

काजोलने सांगितले, अजन देवगणबरोबर लग्न करण्याचा विचार केला की, त्यांने मला एक लायब्ररी करुन देण्याचे वादा केला होता. जसे  हॉलिवूड  सिनेमा ‘ब्यूटी एंड दि बीस्ट’मध्ये तसे आहे.

काजोल अनेक वेळा शुटींगच्यावेळी पुस्तकात डोके खूपसलेली दिसते. तिच्याजवळ नेहमी पुस्तक असते. वाचण्याचे श्रेय तिने आपली आई तनुजाला दिले आहे. तिनेच मला वाचनाची आवड निर्माण केली. यावेळी तनुजाही प्रेक्षकांमध्ये उपस्थित होती.

काजोलने सांगितले, मला असे कधी आठवड नाही की आईच्या हातात पुस्तक नाही. तिच्या खोलीत ४०० पुस्तकांचे संग्रह आहे. तो माझ्या डोक्यांच्यावर आहे. माझ्या खोलीतही पुस्तकांचे ग्रंथालय आहे. माझ्या घरात तीन ग्रंथालय आहेत.