मुंबई: अक्षय कुमार, सिद्धार्थ मल्होत्राच्या 'ब्रदर्स'नं बॉक्स ऑफिसवर आपला जम बसवलाय. पहिल्याच आठवड्यात करण जोहरच्या ब्रदर्सनं 50 कोटी रुपयांपेक्षा जास्त कमाई केलीय.
सलग दोन दिवसांच्या आलेल्या सुट्यांचाही फायदा 'ब्रदर्स'ला झालाय. शुक्रवारी त्याचा गल्ला १५ कोटींपेक्षा जास्त, शनिवारी तो २१ कोटींचा तर रविवारी १५ कोटी रुपयांचा झाला. यामुळं बॉक्स ऑफिसवर त्याची चांगली सुरुवात झाली.
जाणकारांच्या दृष्टीनं अनेक जण कमकुवत कथा आणि विस्कळीत पटकथेमुळं नाराज आढळले तरी अक्षय कुमार आणि सिद्धार्थ मल्होत्राशिवाय जॅकी श्रॉफच्या दमदार अभिनयानं प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत. चित्रपटाच्या यशात शेवटच्या हाणामारीचीही मोठी भूमिका आहे. 'ब्रदर्स' पहिल्याच आठवड्यात १०० कोटींच्या क्लबमध्ये जाऊन बसण्याचे संकेत मिळत आहेत. सोमवारीही त्याची चांगली कमाई झाली.
बॉक्स ऑफिसवर सलमान खानच्या 'बजरंगी भाईजान'ची एकूण कमाई ३१५ कोटींपर्यंत जाऊन पोहोचली आहे. 'बाहुबली'ची कमाई ५५० कोटी रुपयांपर्यंत पोहोचली आहे.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.