मुंबई: अभिनेता आमिर खानचा आगामी चित्रपट 'पिके' प्रदर्शित होण्याआधीच वादात सापडला आहे. बॉलिवूड अभिनेता आमिर खान आणि एका वृत्तपत्राविरोधात शुक्रवारी कानपूरच्या न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली आहे.
आमिरच्या चित्रपटाच्या पोस्टरमध्ये अश्लिलता दर्शविली आहे आणि यानं लैंगिक हिंसा होईल असं याचिकेत म्हटलं आहे. ही याचिका एका वकीलाकडून सादर केली गेली आहे. याचिकेत आमिर खान शिवाय एका वृत्तपत्राविरोधात देखील तक्रार केली आहे. कारण या वृत्तपत्राने 'पिके' चित्रपटाचं पोस्टर छापलं होतं.
गुरुवारी आमिर खानच्या या आगामी चित्रपट 'पिके'चं पोस्टर प्रसिद्ध झालंय. यात आमिर खानचं नग्न चित्र असलेलं पोस्टर प्रसिद्ध करण्यात आलं होतं. ज्यात आमिरनं आपलं शरीर केवळ एका ट्रान्झिस्टरद्वारे झाकलेलं आहे. राजकुमार हिरानी दिग्दर्शित हा चित्रपट 19 डिसेंबर रोजी प्रर्दशित करण्यात येणार आहे.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.