'नीरजा' ही माझी सर्वोत्कृष्ट भूमिका नाही - सोनम कपूर

नवी दिल्ली : बॉलिवूड अभिनेत्री सोनम कपूरची मुख्य भूमिका असलेला 'नीरजा' हा चित्रपट सध्या बॉक्स ऑफिसवर खूप गाजतोय.

Updated: Feb 27, 2016, 09:29 AM IST
'नीरजा' ही माझी सर्वोत्कृष्ट भूमिका नाही - सोनम कपूर title=

नवी दिल्ली : बॉलिवूड अभिनेत्री सोनम कपूरची मुख्य भूमिका असलेला 'नीरजा' हा चित्रपट सध्या बॉक्स ऑफिसवर खूप गाजतोय. यातल्या सोनम कपूरच्या अभिनयाचंही सर्वांकडून खूप कौतुक होतंय. काहींच्या मते तर सोनमने आत्तापर्यंत केलेल्या भूमिकांमधली ही सर्वात चांगली भूमिका आहे. पण, सोनमला असं वाटत नाही.

तिच्या मते तिला खूप काही शिकायचंय. त्याहीपेक्षा महत्त्वाचं म्हणजे तिला अजून तिच्या बॉलिवूड करिअरमधील सर्वात चांगली भूमिका अद्याप मिळालेली नाही. सोनम म्हणते "मला 'रांझना'च्या वेळीही अशाच प्रतिक्रिया मिळाल्या होत्या. मला अजून खूप मोठा पल्ला गाठायचाय; खूप काही शिकायचंय. मी देवाकडे प्रार्थना करते की हे माझ्या आयुष्यातलं सर्वोत्तम काम न ठरो."

सोनम कपूर म्हणाली की या चित्रपटात तिने साकारलेली नीरजाची भूमिका हा तिच्यासाठी एक खूप भावनात्मक प्रवास होता. तिच्या सर्वोत्कृष्ट प्रवासासाठी ती अनेक दिवस थांबायला तयार आहे. जेव्हा ती यशाच्या सर्वोच्च शिखरावर असेल तेव्हा तिला अशी एखादी सर्वोत्कृष्ट भूमिका साकारायला आवडेल, असे सोनम म्हणाली.