कपिल शर्माचा कॉमेडी नाईट्स शो बंद होणार

कपिल शर्माच्या चाहत्यांसाठी वाईट बातमी आहे. गेल्या तीन वर्षांपासून कलर्स वाहिनीवर सुरु असलेला कॉमेडी नाईट्स विथ कपिल हा शो बंद कऱण्याचा निर्णय़ कपिलने घेतलाय. १७ जानेवारी २०१६मध्ये या शोचा अखेरचा एपिसोड असेल. 

Updated: Dec 20, 2015, 04:52 PM IST
कपिल शर्माचा कॉमेडी नाईट्स शो बंद होणार title=

नवी दिल्ली : कपिल शर्माच्या चाहत्यांसाठी वाईट बातमी आहे. गेल्या तीन वर्षांपासून कलर्स वाहिनीवर सुरु असलेला कॉमेडी नाईट्स विथ कपिल हा शो बंद कऱण्याचा निर्णय़ कपिलने घेतलाय. १७ जानेवारी २०१६मध्ये या शोचा अखेरचा एपिसोड असेल. 

टाईम्स ऑफ इंडियाने दिलेल्या वृत्तानुसार, कपिलच्या टीमने हा निर्णय घेतल्याची माहिती आहे. कलर्स चॅनेल कपिलच्या शोला वगळून कॉमेडी नाईट्स बचाओ या शोला अधिक प्रोमोट केल्याचा आरोप कपिल आण टीमने केला. 

गेल्या तीन वर्षांपासून आम्ही प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहोत. जेव्हा प्रेक्षकांना आमच्या शोची सवय झालीये तेव्हा वाहिनीवाले याच नावाने आणखी एक शो आणत आहेत. जे सेलिब्रेटीज आमच्या शोमध्ये येण्यास तयार झालेत ते या दुसऱ्या शोमध्येही उपस्थित राहणार आहेत. शो हिट करण्यासाठी चॅनेलवर असलेला दबाव मी जाणतो, असे कपिल यावेळी म्हणाला.