महेश भट्ट यांना उडवण्यासाठी ११ लाखांची सुपारी, कट उधळला

बॉलीवुड निर्माता - दिग्दर्शक महेश भट्ट यांना ठार मारण्याचा कट पोलिसांनी उधळून लावलाय. 

Updated: Nov 18, 2014, 12:06 PM IST
महेश भट्ट यांना उडवण्यासाठी ११ लाखांची सुपारी, कट उधळला title=

मुंबई : बॉलीवुड निर्माता - दिग्दर्शक महेश भट्ट यांना ठार मारण्याचा कट पोलिसांनी उधळून लावलाय. 

निर्माता करीम मोरानी यांच्या घरावर केलेल्या गोळीबाराचं प्रकरण उलगडताना पोलिसांच्या हाती भट्ट यांच्यावर हल्ला होणार असल्याची खबर लागली आणि खार इथं राहणाऱ्या भट्ट यांना मारण्यासाठी आलेल्या आरोपींचा कट उधळून पोलिसांनी लावला. 

याप्रकरणी, मुंबई पोलिसांनी १३ आरोपींना अटक केलीय. यामध्ये, २३ ऑगस्ट रोजी जुहूच्या मोरानी ब्रदर्सच्या घरामध्ये घुसून गोळीबार करणाऱ्या सहा जणांचा समावेश आहे. त्यांच्याकडून मुंबई गुन्हे शाखेने अनेक मोबाईल्स, तीन पिस्तुल आणि १५ राऊंड जप्त केले आहेत, अशी माहिती पोलिसांनी दिलीय. गेल्या काही महिन्यांपासून बॉलिवूडमधील बड्या हस्तींना धमकावण्याचं सत्र सुरु असून जोपर्यंत धमकावणाऱ्या खऱ्या सूत्रधाराला अटक केली जात नाही, तोपर्यंत हे सत्र बंद होणे जरा कठीणच आहे.

डॉन रवी पुजारी यानं महेश भट्ट यांच्या हत्येचा कट रचल्याची माहिती मिळतेय. क्राईम ब्रान्चच्या सूत्रांनॉ दिलेल्या माहितीनुसार, पुजारीनं मोरानी ब्रदर्स आणि महेश भट्ट यांच्या सुपारीसाठी आपल्या शूटर्सना ११ लाख रुपये दिले होते. या प्रकणातील सर्व आरोपींना २४ नोव्हेंबर पर्यंत पोलीस कोठडीत धाडण्यात आलंय. 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.