मुंबई: बॉलिवूडचा दबंग खान सलमान खानची लाडकी बहिण अर्पिता खानचा विवाह आहे. अर्पिताचं लग्न बिझनेसमन आयुष शर्मा सोबत होतंय. यादरम्यान बॉलिवूडमध्ये ही चर्चा सुरू झालीय की, सल्लू मियाँ आपल्या लाडक्या बहिणीला लग्नाचं गिफ्ट काय देणार?
सलमान नेहमीच अशा वेळी खूप मौल्यवान गिफ्ट देण्यासाठी प्रसिद्ध आहेत. त्याचं दातृत्व प्रसिद्ध आहे. मिळालेल्या माहितीनुसार सलमाननं आपल्या बहिणीला 16 कोटींचा फ्लॅट गिफ्ट केलाय. सांगण्यात येतंय की, मुंबईतल्या कार्टर रोडवर असलेल्या 3बीएचके फ्लॅटची किंमत 16 कोटी आहेत. हा फ्लॅट सलमान घर म्हणजेच गॅलॅक्सी अपार्टमेंटपासून अवघ्या 5 मिनीटांच्या अंतरावर आहे.
अर्पिता खानचा आज हैदराबादमध्ये विवाह होतोय. या शाही विवाह सोहळ्याला अनेक बॉलिवूड दिग्गज उपस्थित राहणार आहेत. सलमान संपूर्ण कुटुंब हॉटेल फलकनुमा इथं पोहोचलाय. 18 आणि 19 अशा दोन दिवसांसाठी हॉटेल बुक करण्यात आलंय. जवळपास 300 व्हीआयपी या लग्नाला येण्याची शक्यता आहे.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.