मास्को : टॅलेन्ट शोमध्ये डान्स करतांना ती नाकावर पडली. यात तिच्या नाकातून रक्त येत होतं. एक्टारिना कोंडार्शिना ही २३ वर्षांची डान्सर आहे, तिचा परफॉर्मन्स सर्वोत्तम होत होता.
मात्र ती डान्स करतांना नाकावर पडली आणि तिच्या नाकातून रक्त येऊ लागलं, तरीही तिने आपला डान्स पूर्ण केला, प्रेक्षकांच्या टाळ्या मिळवल्या, मात्र ती जेव्हा स्टेजवरून परतत होती. तेव्हा तिच्या नाकातून रक्त येत होतं, स्टुडिओच्या आत गेल्यानंतरही तिच्या नाकातलं रक्त थांबत नव्हतं.
सर्वात लोकप्रिय रशियन टॅलेन्ट शो 'सो यू थिंक यू कॅन डान्स'मध्ये ही घटना घडली, नेमकं डान्स करतांना या युवतीचं नाक कसं फ्रॅक्चर झालं ते व्हिडीओत पाहा.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.