कान फिल्म महोत्सव : दीपिकावर खिळल्या अनेकांचा नजरा

कान फिल्म महोत्सवात दीपिका पादुकोण वांगी रंगाचा गाऊन परिधान करुन रेडकार्पेटवर तिचा जलवा पाहायला मिळाला. अनेक जण तिच्याकडे वळून वळून पाहत होते. कान फिल्म फेस्टिव्हल बऱ्याच कारणांनी चर्चेत आहे. ७० व्या कान फिल्म फेस्टिव्हलमध्ये अभिनेत्री दीपिका पदुकोणने पदार्पण केलेय.

Surendra Gangan सुरेंद्र गांगण | Updated: May 18, 2017, 03:38 PM IST
कान फिल्म महोत्सव : दीपिकावर खिळल्या अनेकांचा नजरा  title=

कान : कान फिल्म महोत्सवात दीपिका पादुकोण वांगी रंगाचा गाऊन परिधान करुन रेडकार्पेटवर तिचा जलवा पाहायला मिळाला. अनेक जण तिच्याकडे वळून वळून पाहत होते. कान फिल्म फेस्टिव्हल बऱ्याच कारणांनी चर्चेत आहे. ७० व्या कान फिल्म फेस्टिव्हलमध्ये अभिनेत्री दीपिका पदुकोणने पदार्पण केलेय.

या फेस्टिव्हलमधील दीपिकाचे पहिले दोन लूक सर्वांसमोर आले तेव्हा अनेकांच्याच नजरा बी- टाऊनच्या या मस्तानीवर खिळल्या होत्या. तिच्या या फोटोंवरुन नजर हटत नाही तोच रेड कार्पेटवर काळ्या रंगाचा जाळीदार पायघोळ गाऊन घातलेली दीपिका पुन्हा एकदा अनेकांच्याच हृदयाचा ठोका चुकवून गेली.