फोटो : धर्मेंद्र-हेमाच्या लग्नाचा वाढदिवस!

ज्येष्ठ अभिनेता धर्मेंद्र आणि अभिनेत्री हेमामालिनी यांनी आपल्या लग्नाचा ३५ वा वाढदिवस खाजगीरित्या पण मोठ्या उत्साहात साजरा केला.

Updated: May 2, 2015, 06:22 PM IST
फोटो : धर्मेंद्र-हेमाच्या लग्नाचा वाढदिवस! title=

मुंबई : ज्येष्ठ अभिनेता धर्मेंद्र आणि अभिनेत्री हेमामालिनी यांनी आपल्या लग्नाचा ३५ वा वाढदिवस खाजगीरित्या पण मोठ्या उत्साहात साजरा केला.

हा आनंद हेमामालिनी यांनी ट्विटरद्वारे आपल्या चाहत्यांसोबत शेअर केलाय. 'एकमेकांसोबत राहणंच प्रेम आहे' अशी प्रेमाची व्याख्याही हेमामालिनी यावेळी केलीय. 

६६ वर्षीय हेमामालिनी यांनी ट्विटरवर आपला आणि धर्मेंद्र यांचा फोटो पोस्ट केलाय.  

 

आणखी एका फोटोत धर्मेंद्र आपल्या पत्नीच्या माथ्याचं चुंबन घेताना दिसत आहेत. 

सीता आणि गीता, शोले, चरस, ड्रीमगर्ल यांसारख्या सिनेमांत एकमेकांसोबत पडद्यावर रोमान्स करणाऱ्या या जोडप्यानं १९८० साली मुस्लिम धर्मात प्रवेश करत एकमेकांसोबत विवाह केला होता. धर्मेंद्र यांनी आपल्या पहिल्या पत्नीशी काडीमोड न घेताच हेमामालिनी यांच्याशी विवाह केलाय.  

ईशा आणि आहना या दोन मुली या जोडप्याला आहेत. सध्या, दोन्हीही मुली आपापल्या संसारात रमल्यात. 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.