फिल्म रिव्ह्यू: 'गब्बर इज बॅक'मध्ये दमदार अक्षयचा जानदार 'अंदाज'

स्पेशल २६, हॉलिडे आणि बेबी सारखे दमदार सिनेमे दिल्यानंतर 'गब्बर इस बॅक' हा सिनेमा कसा असेल, याची उत्सूकता तुम्हाला असेलच. गब्बर हा सिनेमा तामिळ सिनेमा रामणाचा रीमेक आहे.  

Aparna Deshpande Aparna Deshpande | Updated: May 2, 2015, 12:32 PM IST
फिल्म रिव्ह्यू: 'गब्बर इज बॅक'मध्ये दमदार अक्षयचा जानदार 'अंदाज' title=

मुंबई: स्पेशल २६, हॉलिडे आणि बेबी सारखे दमदार सिनेमे दिल्यानंतर 'गब्बर इस बॅक' हा सिनेमा कसा असेल, याची उत्सूकता तुम्हाला असेलच. गब्बर हा सिनेमा तामिळ सिनेमा रामणाचा रीमेक आहे.  

'गब्बर इज बॅक' हा सिनेमा खरंतर एक वन मॅन आर्मी आहे. दिग्दर्शक क्रिशचा हा दिग्दर्शनात डेब्यू असलेला सिनेमा आहे. अक्षय कुमारचं या सिनेमातलं नाव जरी गब्बरचं असलं तरी त्याचे कारनामे हिरोचे असतात. त्याच्या भूमिकेचा  आणि शोलेमधल्या गब्बरचा काहीही संबंध नाही.. इन शॉर्ट good v/s evilअशा बॅकग्राउंडवरचा हा सिनेमा आहे.

कथानक

आम्ही जसं तुम्हाला म्हटलं की हा एक वन मॅन आर्मी असा सिनेमा आहे. देशातून भ्रष्टाचार संपवण्यासाठी हा गब्बर पुढाकार घेता. भ्रष्ट लोकांचा नायमाट करायचा असा निश्चय करतो. भ्रष्टाचारात सामिल असलेल्या प्रत्येकाला तो भर चौकात नेउन संपवतो. अशातच एंट्री होते ती सुमन तलवार या नटाची. गब्बर आणि सिनेमाचा खरा विलन सुमन तलवार जेव्हा आमने सामने येतात तेव्हा काय घडतं. याच बरोबर अभिनेता सुनिल ग्रोवरनंही यात त्याच्या नेहमीच्या जोनरपासून खूपच हटके भूमिका केली आहे. या सिनेमात त्यानं एका पोलीस अधिकाऱ्य़ाची भूमिका केलिये. गुत्थी या त्याच्या टीपीकल रोलमधून तो फायनली बाहेर पडलाय.

अभिनेत्री श्रूती हसननं या सिनेमात जे काही केलंय ते खूपच साइडट्रॅक वाटतं. खरंतर तिला सिनेमात अभिनयासाठी काही स्कोपच ठेवला नाहीये. श्रूतीनं तिच्या करिअरच्या पॉइंट ऑफ व्ह्यूवनं आता विचार करायला हवा. एवढंच नाहीतर सिनेमे स्वीकारतानाही जपून आणि विचार करुनच पाऊल उचलावं.

अभिनय

या सिनेमात ज्यानं खऱ्या अर्थानं बाजी मारला आहे तो म्हणजे अभिनेता अक्षय कुमार. त्याचा अभिनय त्याची अदा... नेहमी प्रमाणेच लाजवाब आहे... या सिनेमात काही खटकतं ते म्हणजे या सिनेमातलं संगीत आणि याचा स्क्रीनप्ले.. सिनेमाच्या स्क्रीप्लेवर जर अधिक काम करता आलं असतं तर कदाचित हा सिनेमा आणखी रंगवता आला असता.. केवळ अक्षय खुमार या नटाच्या अभिनयासाठी आम्ही या सिनेमाला देतोय २.५ स्टार्स.

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.