सलमान आणि ऐश्वर्याच्या गाण्यावर सनीची हॉट 'लीला'

बॉलिवूडची बेबी डॉल सनी लिऑन आणखी एक धमाकेदार गाणं घेऊन तयार आहे. सनीचा आमागी चित्रपट 'लीला'चं नवं गाणं रिलीज झालंय.

Updated: Mar 29, 2015, 09:57 AM IST
सलमान आणि ऐश्वर्याच्या गाण्यावर सनीची हॉट 'लीला' title=

मुंबई: बॉलिवूडची बेबी डॉल सनी लिऑन आणखी एक धमाकेदार गाणं घेऊन तयार आहे. सनीचा आमागी चित्रपट 'लीला'चं नवं गाणं रिलीज झालंय.

यावेळी सनी 'ढोली तारो ढोल बाजे' या गाण्यावर बोल्ड अवतारात दिसेल. हे गाणं सलमान खान आणि ऐश्वर्याच्या 'हम दिल दे चुके सनम' चित्रपटातील गाणं आहे. 

लीलामध्ये हे गाणं मिट ब्रोस अंजाननं गायलंय तर गीतकार कुमार आहेत. पुनर्जन्मच्या कथेवर आधारित 'लीला'मध्ये सनी लिऑन दोन भूमिकांमध्ये दिसणार आहे ते ही बोल्ड अवतारात.

या चित्रपटाच्या ट्रेलरनं यु-ट्यूबवर १ कोटींचा टप्पा ओलांडलाय. चित्रपटात सनीसोबत जय भानुशाली, रजनीश दुग्गल आणि राहुल देव मुख्य भूमिकेत आहेत. १० एप्रिलला हा चित्रपट रिलीज होणार आहे. 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.