मुंबई : शाहरूख खान, काजोल, वरूण धवन आणि कृति यांचा दिलवाले चित्रपट नुकताच प्रदर्शित झाला आहे. चित्रपट पाहण्याआधी या चित्रपटा विषयी काही गोष्टी तुम्हांला माहिती असणे गरजेचे आहे.
शाहरूखच्या हॅप्पी न्यू ईयर एवढा तर नाही मात्र रोहित शेट्टीचा हा चित्रपट तुम्हा कंटाळवाना वाटू शकतो. चित्रपटात बरेच नको असणारे दृश्य आहेत.
चित्रपटात एकच चांगली गोष्ट आहे ती म्हणजे चित्रपटाचा शेवट कारण अख्या चित्रपटात शाहरूख आणि काजोल यांच्यातील रोमांस फक्त चित्रपटाच्या शेवटीच पहायला मिळणार आहे. शाहरूख आणि काजोलला पुन्हा एकत्र पाहण्यासाठी चित्रपट पाहायचा असेल तर नक्की जा मात्र चित्रपटात काही अशाही गोष्टी आहेत ज्यामुळे तुमची निराशा होऊ शकते.
चित्रपटातल्या तुम्हाला निराश करणाऱ्या गोष्टी :
-चित्रपटात कोठेच शाहरूख काजोलचा रोमांस पाहायला मिळणार नाही.
-शाहरूख आणि वरूण दोघे भावाच्या रोलमध्ये सूट नाही होत.
-शाहरूख, वरूणचे सीन कंटाळवाने आहेत.
-रोहित शेट्टीच्या चित्रपट बघण्याचे कारण म्हणजे त्यांच्या चित्रपटातील जबरदस्त अॅक्शन, पण या चित्रपटात असे काहीच नाही.
-अॅक्शनमध्ये इतका इमोशन आणि ड्रामा आहे की काही वेळासाठी आपल्याला अब्बास मस्तानच्या चित्रपटांची आठवण येईल.
-चित्रपटात कोठेच विनोदी सीन नाहीत.
-रोहितच्या इतर चित्रपटांप्रमाणे पंच किंवा आठवणीत राहतील असे डायलॉग नाही.
-हसवण्याचा प्रयत्न केला आहे मात्र तोही फसला आहे.
-चित्रपटात फक्त तिनच चांगले पंच आहे.
-चित्रपटात बरेच मोठे मोठे कलाकार आहेत मात्र सगळे पाहुण्या कलाकारांच्या भूमिकेत आहेत.
-चित्रपटात नको असलेले अनेक कलाकार आहेत.
-चित्रपटातील क्लायमॅक्सची जेवढी चर्चा झाली तेवढा क्लायमॅक्स चित्रपटात दिसत नाही.
-अचानक चित्रपट चालू असतानाचा शेवट होतो असे वाटते.
-रोहितच्या प्रत्येक चित्रपटात दिसणारे सेट या चित्रपटात आहे, त्यामुळे प्रत्येक सीनला आधीच्या चित्रपटांची आठवण येते.
-शाहरूखचा मेकअप चांगला वाटतो मात्र काजोल २० वर्षात आणि ४० वर्षात दोन्ही ठिकाणी सारखीच वाटते.
-चित्रपटात जनम जनम सोडून कोणतेच चांगले गाणं नाही.