'बीपी' नंतर आता 'न्यूड' सिनेमा

रवी जाधव याने 'बीपी' नंतर आता 'न्यूड' सिनेमावर भर दिलाय. या सिनेमाचे पोस्टर त्याने लॉन्च केलेय.

Updated: Sep 29, 2015, 07:00 PM IST
'बीपी' नंतर आता 'न्यूड' सिनेमा title=

मुंबई : रवी जाधव याने 'बीपी' नंतर आता 'न्यूड' सिनेमावर भर दिलाय. या सिनेमाचे पोस्टर त्याने लॉन्च केलेय.

मराठीत दमदार सिनेमे देण्याचा चंग दिग्दर्शक रवी जाधव याने बांधलेला दिसत आहे. त्याच्या आगामी 'न्यूड' या पोस्टरमुळे दिसून येतोय. आपल्या चित्रपटाची जाहिरात कशी करावी, हे दिग्दर्शक रवी जाधवला चांगलेच माहीत आहे, या पोस्टरवरून दिसून येत आहे.

‘बालगंधर्व’, ‘नटरंग’, ‘बीपी’, ‘मित्रा’ या चित्रपटांमधून रवी जाधव याने वेगळ्या धाटणीचे विषय हाताळले आहेत. आता 'न्यूड' सिनेमाच्या माध्यमातून त्याने नवा विषय हाताळल्याचे दिसत आहे. 

रवी जाधव याने फेसबुकवर 'न्यूड'च्या पोस्टरबाबत पोस्ट लाकलेय. त्याच्या आगामी चित्रपटाचे नाव 'न्यूड' असे आहे. पेंटिंग स्वरुपात असलेल्या या पोस्टरवर मुलीचा चेहरा दिसतो. मात्र, चित्रपटातील कलाकार कोण असतील याबाबतची माहिती दिलेली नाही. 'न्यूड' या नावामुळे चित्रपटाविषयी उत्सुकता रवी जाधवने निर्माण केली आहे.
 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

*   झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.