तारक मेहता फेम दिशा वकानी लवकरच लग्नाच्या बोहल्यावर

सब टिव्ही चॅनेलवरील प्रसिद्ध शो 'तारक मेहता का उल्टा चष्मा'मधील अभिनेत्री दिशा वकानी अर्थात तुमची आमची दयाभाभी लवकरच लग्नाच्या बोहल्यावर चढणार आहे. 

Updated: Nov 22, 2015, 12:25 PM IST
तारक मेहता फेम दिशा वकानी लवकरच लग्नाच्या बोहल्यावर

मुंबई : सब टिव्ही चॅनेलवरील प्रसिद्ध शो 'तारक मेहता का उल्टा चष्मा'मधील अभिनेत्री दिशा वकानी अर्थात तुमची आमची दयाभाभी लवकरच लग्नाच्या बोहल्यावर चढणार आहे. 

येत्या २४ नोव्हेंबरला ही ३७ वर्षीय अभिनेत्री दिशा मुंबईस्थित चार्टड अकाउंटंट मयुरशी विवाहबद्ध होत आहे. या दोघांचा रिसेप्शन सोहळा २६ नोव्हेंबरला पार पडणार आहे. दिशाच्या लग्नसोहळ्याला तारक मेहताची संपूर्ण टीम उपस्थित राहणार असल्याचे सांगितले जात आहे.

गुजराती थिएटरमधून अभिनयाच्या कारकिर्दीला सुरुवात करणाऱ्या दिशाने २००२ मध्ये  देवदास चित्रपटात काम केले आहेत. तसेच २००८मध्ये जोधा अकबरमध्येही तिने भूमिका साकारली होती. २००८ पासून ती तारक मेहता या शोमध्ये काम करतेय. 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.