‘गब्बर'चा नेपाळच्या भूकंपाला धक्का

‘गब्बर ईज बॅक‘ चित्रपटाचा निर्माता, चित्रपटाची पहिल्या दिवसाची कमाई नेपाळ भूकंपग्रस्तांसाठी मदत म्हणून देणार आहे, अशी अफवा सध्या सोशल नेटवर्किंगवर फिरतेय.

Updated: Apr 29, 2015, 06:01 PM IST
‘गब्बर'चा नेपाळच्या भूकंपाला धक्का title=

मुंबई : ‘गब्बर ईज बॅक‘ चित्रपटाचा निर्माता, चित्रपटाची पहिल्या दिवसाची कमाई नेपाळ भूकंपग्रस्तांसाठी मदत म्हणून देणार आहे, अशी अफवा सध्या सोशल नेटवर्किंगवर फिरतेय.

मात्र पहिल्या दिवसाच्या गल्ल्याची मदत ही अफवाच असल्याचं स्पष्ट झाल्याने गब्बरने नेपाळच्या भूकंपाला धक्का दिल्याचं म्हटलं जात आहे.

याबाबतचा निर्णय चित्रपटाचा निर्माता घेऊ शकतो, आपण नाही, असं अभिनेता अक्षय कुमारने म्हटलंय. ‘गब्बर ईज बॅक‘ या चित्रपटामध्ये अभिनेता अक्षयकुमार याने भूमिका साकारली आहे.

गब्बर ईज बॅक' या चित्रपटाची पहिल्या दिवसाची कमाई नेपाळला दिली जाणार आहे का, याविषयी प्रेक्षकांमध्ये अजूनही संभ्रम कायम आहे.

चित्रपटाच्या पहिल्या दिवसाची कमाई भूकंपग्रस्तांना देण्याचा निर्णय मी घेतला आहे, अशी अफवा पसरली होती. परंतु, खरोखरच पहिल्या दिवसाची कमाई भूकंपग्रस्तांना देण्याचा निर्णय निर्माता घेऊ शकतो, मी नाही,‘ असेही अक्षय कुमारने स्पष्ट केलंय.

‘पहिल्या दिवसाची कमाई अक्षयकुमारने भूकंपग्रस्तांना देण्याचा निर्णय घेतला आहे', अशी माहिती सोशलनेटवर्किंगवर प्रसारित झाली होती, यावर अक्षय कुमारने ही माहिती दिली आहे.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.