'माझ्या देशभक्तीवर प्रश्नचिन्ह उभं करण्याचा कुणालाही अधिकार नाही'

पाकिस्तानच्या चांगल्या गोष्टींचं कौतुक भारताकडून व्हायला हवं, असं म्हणणारे बॉलिवूडचे प्रसिद्ध अभिनेते नसरुद्दीन शाह यांच्यावर बरीच टीका झाली. यानंतर, एका वर्तमानपत्राशी बोलताना नसरुद्दीन शाह यांनी आपण मुस्लिम असल्याकारणानंच आपल्याला टार्गेट केलं जात असल्याचं म्हटलंय. 

Updated: Oct 15, 2015, 12:41 PM IST
'माझ्या देशभक्तीवर प्रश्नचिन्ह उभं करण्याचा कुणालाही अधिकार नाही' title=

मुंबई : पाकिस्तानच्या चांगल्या गोष्टींचं कौतुक भारताकडून व्हायला हवं, असं म्हणणारे बॉलिवूडचे प्रसिद्ध अभिनेते नसरुद्दीन शाह यांच्यावर बरीच टीका झाली. यानंतर, एका वर्तमानपत्राशी बोलताना नसरुद्दीन शाह यांनी आपण मुस्लिम असल्याकारणानंच आपल्याला टार्गेट केलं जात असल्याचं म्हटलंय. 

'माझा नाव नसरुद्दीन शाह आमि आणि कदाचित यामुळेच मला टार्गेट बनवलं जातंय... असं म्हणताना मला खूप दु:ख होतंय. या देशात मी कधीही माझ्या धार्मिक ओळखीसोबत जीवन जगलेलं नाहीय'

अधिक वाचा - सेनेच्या 'त्या' सहा पठ्ठ्यांना उद्धव ठाकरेंकडून शाब्बासकी!

'चार पिढ्यांपासून आमचं कुटुंब याच देशात राहताय. मी भारतीय असल्याचा मला अभिमान आहे. मी माझ्या देशभक्तीवर प्रश्नचिन्ह उपस्थित उभं करण्याचा अधिकार कुणालाही देणार नाही' असंही त्यांनी निक्षूण बजावलंय. 

पाकिस्तानच्या चांगल्या गोष्टींची प्रशंसा करणं भारतविरोधी कसं असू शकतं? या प्रश्नावर शाह म्हणतात, 'जर मी म्हटलं की इमरान खान महान क्रिकेटर आहे तर याचा अर्थ असा होतो का की सुनील गावसकर त्याच्यापेक्षा कमी आहे? ज्यांना घृणा करायचीय ते कोणतीही गोष्टी कोणत्याही अर्थानं घेऊ शकतात'.

अधिक वाचा - 'विरोध गुलाम अलींना नव्हे तर पाकिस्तानला'; सेना नरमली

मुंबईत झालेल्या पाकिस्तानचे माजी परदेश मंत्र्यांच्या पुस्तक उद्घाटनप्रसंगी नसरुद्दीन शाह यांनी पाकिस्तानच्या चांगल्या गोष्टींचं कौतुक व्हायला हवं, असं म्हटलं होतं.

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.