जे टाळण्यासाठी राणीनं मुंबई सोडलं... तेच पॅरीसमध्येही घडलं!

ज्यासाठी राणी मुखर्जीनं भारत सोडून काही दिवसांसाठी परदेशात राहणं पसंत केलं... तेच परदेशातही घडलंय. 

Updated: May 31, 2016, 11:10 PM IST
जे टाळण्यासाठी राणीनं मुंबई सोडलं... तेच पॅरीसमध्येही घडलं! title=

पॅरीस : ज्यासाठी राणी मुखर्जीनं भारत सोडून काही दिवसांसाठी परदेशात राहणं पसंत केलं... तेच परदेशातही घडलंय. 

सध्या राणी मुखर्जी तिच्या चिमुकल्या आदिरासह पॅरीसमध्ये आहे. राणीचा पती म्हणजेच आदित्य चोप्रा हाही सध्या पॅरीसमध्ये 'बेफिक्रे'चं शुटींगमध्ये रणवीर कपूर आणि वाणी कपूरसोबत व्यस्त आहे. 

आदिराला लाईमलाईटपासून दूर ठेवण्यासाठी राणी तिच्या जन्माअगोदरपासून प्रयत्नशील आहे. याचसाठी तिनं काही काळ मुंबई सोडणंही पसंत केलंय. पण, परदेशातही राणी आणि तिच्या मुलीला चाहत्यांनी घेरलंच. 

राणी-आदिराला घेरलं

'स्पॉटबॉय' या वेबसाईटनं दिलेल्या माहितीनुसार, राणी जेव्हा 'बेफिक्रे'च्या शुटींगस्थळी आपल्या मुलीला घेऊन पोहचली तेव्हा चाहत्यांनी त्यांच्याभोवती एकच घोळका केला. त्यांच्यापासून दूर जाण्यासाठी राणीला आणि तिच्या असिस्टंटना खूप प्रयत्न करावा लागला. 

आदिराचा फोटो ऑनलाईन नकोय

आदिराचा कुणीही फोटो काढून तो वेबसाईटवर टाकू नये, यासाठी राणीनं सर्वोतोपरी प्रयत्न केले... पण, घोळका बधत नाही, हे पाहून राणीनं तात्काळा आदिराला घेऊन हॉटेल गाठलं.