मुंबई : १९९३ मध्ये झालेल्या बॉम्बस्फोट प्रकरणी शिक्षा भोगत असलेला कुख्यात गँगस्टर अबू सालेमच्या जीवनावर आधारित चित्रपट बनणार आहे. ड्रेडेड गँगस्टर असे या चित्रपटाचे नाव असेल.
सुवहदान आंग्रे लेखक आणि निर्माते असणार आहे. पुढील वर्षी ऑक्टोबरमध्ये हा चित्रपट प्रदर्शित होईल. चित्रपटाची शूटिंग पुणे, मुंबई, दुबई आणि लिस्बेन येथे सुरु कऱण्यात आलीय. चित्रपटाची कथा अबू सालेमच्या सुरुवातीच्या जीवनापासून सुरु होईल.
सुरुवातीला अबू सालेम उत्तर प्रदेशातील आझमगड येथे राहत होतो. त्यानंतर नोकरीच्या शोधात तो कसा दिल्लीला आणि त्यानंतर मुंबईतील डॉन दाऊद इब्राहिमच्या गँगचा हिस्सा कधी झाला हे सर्व या चित्रपटात दाखवले जाईल. त्यानंतर तो कसा मोठा गँगस्टर बनला आणि त्याने बॉलीवूडमध्ये कशी दहशत पसरवली हे सर्व यात दाखवण्यात येणार आहे.