फिल्म रिव्ह्यू : अमित-मंजिरीचा 'डबल सीट' प्रवास

Updated: Aug 15, 2015, 12:53 PM IST
फिल्म रिव्ह्यू : अमित-मंजिरीचा 'डबल सीट' प्रवास title=

 

चित्रपट : डबल सीट
निर्माता : रंजित गुगले
दिग्दर्शक : समीर विद्वांस
गीत : स्पृहा जोशी, क्षितिज पटवर्धन, समीर विद्वांस
संवाद : क्षितिज पटवर्धन
कलाकार : अंकुश चौधरी, मुक्ता बर्वे

 

जयंती वाघदरे
प्रतिनिधी, झी २४ तास

मुंबई : स्वप्न पहायला तर सगळ्यानाच आवडतं.. पण त्या स्वप्नाला वास्तवात उतरवण्यासाठी प्रयत्न करणारे मात्र खूपच कमी असतात.. त्यांच्या जिद्ध आणि परिश्रमामुळेच त्यांची स्वप्नपूर्ती होते. अशाच एका मध्यम वर्गीय कुटुंबाची ही गोष्ट म्हणजेच डबल सीट हा सिनेमा... 

कथानक 
मुंबापुरीमध्ये राहणारा प्रत्येक जण कधी उपाशी झोपत नाही... ही मुंबई त्याला काहीतरी आधार नक्कीच देते... अशा मुंबई शहरात स्वताहच्या स्वप्नातलं घर विकत घेणं हे सोपं नाही.. पण ते अशक्यही नाही... अशाच काहीशा पार्श्वभूमीवरचा  सिनेमा म्हणजे समीर विद्वांस दिग्दर्शित डबल सीट...

मुक्ता बर्वे आणि अंकुश चौधरी स्टारर डबल सीट ही कहाणी आहे अमित आणि मंजिरी नाइक या जोडप्याची आणि त्यांच्या स्वप्नांची... लालबाग या परिसारात एका चाळीत राहणाऱ्या नाईक कुटुंबाची घर विकत घेण्यासाठीची धडपड यात मांडण्यात आली आहे.

डबल सीट या सिनेमात दिग्दर्शक समीर विद्वांस यांनी सिनेमाला खूप रियलीस्टीक लूक देण्याचा प्रयत्न केलाय. मुंबईतल्या चाळीत राहणाऱ्या मराठी लोवर मिडल क्लास कुटुंब कसं जगतं त्यांची स्वप्न, त्यांच्या लिमिटेशन्स या सगळ्या गोष्टी यात अतिशय रंजकपणे मांडण्यात आल्या आहेत... त्यानं सिनेमासाठी निवडलेलं लोकेशन, यातले कलाकार सगळं एकदम आपआपल्या जागी फिट बसलेत. 

संवाद
या सिनेमाचा  यूएसपी म्हणजे यातले संवाद... खुप भारी आणि जड शब्दांचा प्रयोग करुन सिनेमा बोर करण्यापेक्षा अगदी साधे पण  मजेशीर आणि प्रेक्षकांच्या मनात सिनेमा संपल्यानंतरही घोळत राहणारे संवाद क्षितीज पटवर्धन यांनी लिहीले आहेत.

अभिनय 
अंकुश चौधरी आणि मुक्ता बर्वे या दोघांनीही या सिनेमात जबरदस्त बॅटींग केली आहे.. या दोघांचाही अभिनय छान झालाय.

याचबरोबर अभिनेता विद्याधर जोशी आणि वंदना गुप्ते यांनीही आपल्या व्यक्तिरेखा छान पार पाडल्या आहेत. विशेष करुन वंदना गुप्ते यांनी रंगवलेली आई आणि सासू ही प्रत्येकाला हवीहवीशी वाटेल अशीच आहे. सिनेमाचा विषय जरी थोडा इमोशनल अंगानं जाणारा असला तरी त्याचं सादरीकरण फुल्ल ऑन एंटरटेनिंग झालंय.

शेवटी काय तर...
हा एक कम्प्लीट एंटरटेनिंग सिनेमा आहे. अनेकांना हा सिनेमा त्यांच्या फ्लाशबॅकमध्ये घेऊन जाईल, काहीं आपल्या वर्तमानाशी या सिनेमाला कनेक्टच करतील. डबल सीट हा एक कंप्लीट पैसा वसूल एंटरटेनिंग सिनेमा आहे. संपूर्ण कुटुंबानं एकत्र पाहावा अशा डबल सीट या सिनेमाला आम्ही देतोय ३.५ स्टार्स...

 

स्पॉटलाइट: डबल सिटच्या कलाकारांसोबत खास बातचित ...

'डबल सीट' (मराठी सिनेमा) : मुक्ता बर्वे, अंकुश ...

'चला हवा येऊ द्या'च्या सेटवर 'डबल सीट'चे कलाकार ...

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.