फिल्म रिव्ह्यू : कथा एक बॉलिवूडच्या 'फॅन'ची!

बॉक्स ऑफिसवर 'किंग खान स्टारर' आणि मनीष शर्मा दिग्दर्शित  'फॅन' हा सिनेमा प्रदर्शित झालाय. या सिनेमात किंग खान दुहेरी भूमिकेत दिसणार आहे. फॅऩ ही कहाणी आहे आर्यन खन्ना या सुपरस्टारची आणि त्याच्या हार्डकोर 'फॅऩ' गौरवची.. या दोन्ही व्यक्तिरेखा किंग खानने साकारल्या आहेत. 

Updated: Apr 15, 2016, 12:15 PM IST
फिल्म रिव्ह्यू : कथा एक बॉलिवूडच्या 'फॅन'ची! title=

दिग्दर्शक : मनिष शर्मा

प्रोड्युसर : आदित्य चोप्रा

कलाकार : शाहरुख खान (आर्यन खन्ना आणि गौरवच्या भूमिकेत)

वेळ : १४३ मिनिटे

मुंबई : बॉक्स ऑफिसवर 'किंग खान स्टारर' आणि मनीष शर्मा दिग्दर्शित  'फॅन' हा सिनेमा प्रदर्शित झालाय. या सिनेमात किंग खान दुहेरी भूमिकेत दिसणार आहे. फॅऩ ही कहाणी आहे आर्यन खन्ना या सुपरस्टारची आणि त्याच्या हार्डकोर 'फॅऩ' गौरवची.. या दोन्ही व्यक्तिरेखा किंग खानने साकारल्या आहेत. 

काय आहे कथानक 

एका सुपरस्टारचे फॅन्स खरंच खुप वेगवेगळ्या प्रकारचे असू शकतात... यातले काही आपले फॅवरेट स्टारचे फोटो आपल्या घरी लावतात, काही मोबाईलवर त्याचा फोटो ठेवतात, न चुकता त्यांचे सिनेमे पाहतात, त्याच्या एका झलकसाठी दिवसरात्र त्यांच्या घराबाहेर त्यांची वाट पाहत असतात, तर यातले काही चक्क आपल्या रक्तानं त्यांच्यासाठी पत्र लिहणारे सुद्धा असतात... असे फॅन्स त्याच्या एका झलकसाठी काहीही करायला तयार होतात... अशा प्रकारच्या फॅन्सपासून स्वता: स्टार्ससुद्धा दूर राहणं पसंत करतात... अशाच एका 'फॅन'ची ही गोष्ट आहे.


सुपरस्टार आर्यनचा फॅन... गौरव

किंग खानचा डबल रोल

आदित्य चोप्रा निर्मित आणि मनिश शर्मा दिग्दर्शित फॅनमध्ये किंग खान शाहरुखचा डबल रोल पहायला मिळतोय. 'फॅन' ही कहाणी आहे आर्यन खन्ना या सुपरस्टारची आणि त्याच्या हार्डकोर फॅन असलेल्या 'गौरव'ची... या दोन्ही व्यक्तिरेखेत दिसतोय शाहरुख खान...

हा आहे बॉलिवूडचा 'फॅन'

लेखक हबीब फैसलनी या सिनेमाची कथा लिहली आहे. फॅन या सिनेमाची कथा अत्यंत इंटरेस्टींग आहे. किंग खान शाहरुखच्या नेहमीच्या सिनेमांपेक्षा हा सिनेमा जरा हटके आहे. ही गोष्ट यातल्या सुपरस्टार आर्यनची कमी आणि त्याच्या फॅन गौरवची जास्त आहे. सिनेमात फार गाणी नाहीत, दिग्दर्शक मनीश शर्मानं सिनेमाच्या जॉनर प्रमाणेच सिनेमाला ट्रीटमेन्ट दिली आहे. खरंतर हॉलिवुडच्या 'फॅन' या सिनेमापासून, शाहरुखचा फॅन हा सिनेमा बऱ्यापैंकी इंस्पायर्ड आहे. 

५० वर्षांचा शाहरुख दिसतोय २० वर्षांचा तरुण

शाहरुखच्या अभिनेयाविषयी सांगायचं झालं तर शाहरुखनं साकारलेली सुपरस्टार आर्यन खन्नाही व्यक्तिरेखा सुंदर झालीय, तर दुसरीकडे त्यानं फॅन गौरवची भूमिकाही उत्तम पार पाडली आहे. एकीकडे एक अतिशय सोफॅस्टीकेटीड, थोडासा गर्विष्ट असा नट त्यानं उभारलाय तर दुसरीकडे एक छोट्या शहरात राहणारा, भाषेतला एक वेगळा लहेजा, टीपीटल देसी स्टाईनं बोलणारा अत्यंत कॉन्ट्रास्ट अशा दोन कॅरेक्टरमध्येही तो पहायला मिळतो. 

मेकअप आणि व्हीएफएक्सची कमाल

गौरव या व्यक्तिरेखेवर खूप काम करण्यात आलंय. मेक अप आणि व्हीएफएक्सच्या माध्यमातून त्याचा लूक खप जबरदस्त वाटतो. ५० वर्षांच्या शाहरुखनं पार पाडलेली गौरव ही व्यक्तिरेखा पडद्यावर केवळ २०-२२ वर्षांचा तरुण वाटतो... सिनेमातील किंग खानचा मेकअप चर्चेचा विषय ठरला असून हा मेकअप करण्यासाठी शाहरुखला तारेवरची कसरत करावी लागायची. याचं श्रेय जातं सिनेमाच्या मेकअप आणि विएफएक्स टीमला... 

सिनेमाचा पुर्वार्ध खुपच रंजक वाटतो, सिनेमाचा उत्तरार्ध मात्र अनेक ठिकाणी खटकतो. खरं तर फॅनचा क्लायमॅक्स शाहरुखच्या चाहत्यांना निराश करु शकतो. दिलवालेचा बॉक्स ऑफिसवर फियास्को झाल्यानंतर किंग खानला फॅनकडून अपेक्षा आहेत, हे मात्र नक्की...