देहविक्री प्रकरणात अडकलेल्या श्वेताला बॉलिवूडची ऑफर

पोलिसांनी देहविक्री प्रकरणी रंगेहाथ पकडल्यानंतर राष्ट्रीय पुरस्कार विजेती अभिनेत्री श्वेता प्रसाद हिचं नाव मीडियासमोर आलं... पण, परिस्थितीमुळे या जाळ्यात अडकल्याचं सांगणाऱ्या श्वेताला बॉलिवूडमधून मात्र मदतीचा हात मिळतोय.

Updated: Sep 9, 2014, 02:54 PM IST
देहविक्री प्रकरणात अडकलेल्या श्वेताला बॉलिवूडची ऑफर title=

मुंबई : पोलिसांनी देहविक्री प्रकरणी रंगेहाथ पकडल्यानंतर राष्ट्रीय पुरस्कार विजेती अभिनेत्री श्वेता प्रसाद हिचं नाव मीडियासमोर आलं... पण, परिस्थितीमुळे या जाळ्यात अडकल्याचं सांगणाऱ्या श्वेताला बॉलिवूडमधून मात्र मदतीचा हात मिळतोय.

सिनेनिर्माते हंसल मेहता यांनी श्वेताला आपल्या आगामी चित्रपटात काम करण्याची संधी दिलीय. ‘मी श्वेता प्रसाद हिला आपल्या आगामी सिनेमात एका भूमिकेचा प्रस्ताव देऊ इच्छितो. मकडी सिनेमात तिनं उत्तम परफॉर्मन्स दिला होता’ असं मेहता यांनी ट्विटरवर म्हटलंय.

सोबतच, श्वेता हिचे फोटो टाकणं बंद करा आणि त्या दलालांचे आणि श्रीमंतांचे फोटो टाका जे श्वेताचे ग्राहकत बनले होते. दुबळ्या व्यक्तीला निशाणा न बनवता बदमाशांचा पर्दाफाश करा... असंही हंसल मेहता यांनी म्हटलंय. 

I intend to offer Shweta Prasad a role in my next film. She was so good in Makdee.

— Hansal Mehta (@mehtahansal) September 4, 2014

Stop posting pictures of Shweta. Put out the pictures of her wealthy clients and the pimp. Expose the scumbags not the soft target.

— Hansal Mehta (@mehtahansal) September 4, 2014

श्वेता हिला गेल्या 31 ऑगस्ट रोजी हैदराबादहून देहविक्री प्रकरणी ताब्यात घेण्यात आलं होतं. सध्या श्वेताला सुधारगृहात पाठवण्यात आलंय. ‘इक्बाल’, ‘मकडी’ या सिनेमांसोबतच ‘कहानी घर घर की’ या एकता कपूरच्या डेलीसोपमध्येही श्वेता दिसली होती. ‘मकडी’साठी तिला 2002 साली सर्वोत्कृष्ट बाल कलाकाराचा राष्ट्रीय पुरस्कारही मिळाला होता. 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.