मुंबई : धकधक गर्ल माधुरी दीक्षित एका टीव्ही रिअॅलिटी शो 'एनी वन कॅन डान्स अब इंडिया की बारी'च्या सेटवर भावूक झाली. यावेळी ती आपले अश्रू रोखू शकली नाही.
या शो मधील स्पर्धक जोडी शम्पा आणि रयान यांच्या भावनात्मक परफॉर्मन्समुळे माधुरी भावूक झाली. त्यांच्या डान्सनंतर संपूर्ण सेटवर टाळ्यांचा कडकडाट झाला. तसेच तिन्ही जजने त्यांचे कौतुक केले. या परफॉर्मन्समध्ये असे काही होते त्यामुळे माधुरीला रडू कोसळले.
या परफॉर्मन्समध्ये एका प्रेमी जोडप्याची काहणी होती. ज्यात प्रेयसीला पार्किंन्ससचा आजार असतो. यामुळे प्रेयसी प्रियकरापासून दूर जाते. आजार असतानाही प्रेमी प्रेयसीला लग्नासाठी विनवणी करतो.
शम्पा आणि रयान यांच्या परफॉर्मन्सचा उद्देश समाजात पार्किंन्सनबद्दल जागरुकता निर्माण व्हायला हवी...