मुंबई : सलमान खाननं बलात्कार झालेल्या महिलांबाबत केलेल्या वादग्रस्त वक्तव्यानंतर त्याच्यावर चौफेर टीका होत आहे. या प्रकरणावर आता शाहरुख खाननंही प्रतिक्रिया दिली आहे.
या प्रकरणी सलमाननं माफी मागावी का असा सवाल शाहरुखला विचारण्यात आला, तेव्हा मागच्या दोन वर्षांमध्ये मी ही चुकीच्या गोष्टी बोललो आहे, त्यामुळे याबाबत मी बोलणं योग्य होणार नाही, असं शाहरुख म्हणाला.
मी स्वत: एवढं बोलतो, मी कोण आहे जो इकडे बसून जजमेंट देऊ किंवा ठरवू की कोणी काय बोलावं, अशी प्रतिक्रिया शाहरुखनं दिली आहे.