असा असेल सलमानच्या 'सुल्तान'चा THE END

सलमान खानचा आगामी चित्रपट 'सुल्तान' पुढील वर्षी ईदला रिलीज होणार आहे. गेल्या महिन्यात चित्रपटाचा टीझर रिलीज झाल्यानंतर सुल्तानबद्दल आणखी उत्सुकता वाढलीय. सलमान या चित्रपटात एका रेसलरच्या भूमिकेत दिसणार आहे. आता फिल्मच्या शेवटाबद्दल नवी बातमी आलीय.

Updated: Aug 27, 2015, 07:28 PM IST
असा असेल सलमानच्या 'सुल्तान'चा THE END title=

मुंबई: सलमान खानचा आगामी चित्रपट 'सुल्तान' पुढील वर्षी ईदला रिलीज होणार आहे. गेल्या महिन्यात चित्रपटाचा टीझर रिलीज झाल्यानंतर सुल्तानबद्दल आणखी उत्सुकता वाढलीय. सलमान या चित्रपटात एका रेसलरच्या भूमिकेत दिसणार आहे. आता फिल्मच्या शेवटाबद्दल नवी बातमी आलीय.

आणखी वाचा - पाहा, सईचा देसी लूक, आणि ४ सुपर हिट गाणे

आतापर्यंत मिळालेल्या माहितीनुसार सलमान चित्रपटात एका वडिलांच्या भूमिकेत आहे. मात्र नुकत्याच मिळालेल्या माहितीनुसार चित्रपटाच्या अखेरीस एक अॅक्शन सिक्वेन्स आहे. तो पाहतांना प्रेक्षकांच्या डोळ्यात अश्रू आणि टाळ्यांचा कडकडात असेल. कारण अखेरची मॅच रेसलर सलमान आणि त्याच्या मुलात होईल.

आणखी वाचा - Awesome Mora Mahiya:'कॅलेंडर गर्ल्स'चं पहिलं गाणं रिलीज

अद्याप सलमानचा ऑनस्क्रीन मुलगा कोण हे कळलं नाहीय. सलमान यात वयस्कर पित्याच्या भूमिकेत नाही तर तरुण पिता असेल. 

 

पाहा सुल्तानचा टीझर-

 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.