मुंबई: अभिनेता सलमान खानला २००२च्या हिट अँड रन प्रकरणात ५ वर्षांची शिक्षा सुनावली गेली. या संपूर्ण प्रकरणात ४ असे प्रश्न आले ज्यांचं उत्तर ना सलमानजवळ होतं ना ही त्याच्या वकीलांजवळ. यामुळंच त्याचं पारडं कमकुवत झालं.
पाहा हे 4 प्रश्न -
पहिला प्रश्न: सलमान आणि त्याचे वकील कोर्टात सांगत राहिले की तो गाडी चालवत नव्हता. मात्र सलमानचा पोलीस बॉडीगार्ड रवींद्र पाटील यानं कोर्टात दिलेल्या आपल्या स्टेटमेंटमध्ये सांगितलं होतं की, सलमानच भरधाव गाडी चालवत होता आणि त्यानं मद्यप्राशन केलं होतं. रवींद्रनं आपल्या साक्षीत सांगितलं होतं की, त्यानं स्वत: सलमानला हळू गाडी चालवायला सांगितलं होतं. रवींद्रचा टीबीमुळे मृत्यू झाला. या प्रकरणात हेच दोन मोठे आरोप होते की, अपघातावेळी सलमान गाडी चालवत होता आणि त्यानं मद्यप्राशन केलं होतं.
दुसरा प्रश्न: सरकारी वकीलांनी याप्रकरणी 27 साक्षीदारांच्या साक्षी कोर्टात सादर केल्या होत्या. ज्यात सलमानचा कौंटुबिक ड्रायव्हर अशोक सिंह सुद्धा सहभागी होता. मात्र नंतर त्यानं पहिले दिलेल्या साक्षीवरून पलटी मारली. अशोक सिंहनं अखेरच्या सुनावण्यांमध्ये सांगितलं की, गाडी तोच चालवत होता, सलमान नाही.
या प्रश्नावर जोरदार चर्चा झाली आणि वाद झाला की, जर अशोक सिंह गाडी चालवत होता. तर त्यानं पहिले कोर्टाला का नाही सांगितलं. सरकारी वकीलांचं म्हणणं होतं की, अपघातावेळी लँड क्रूझरमध्ये फक्त तिघं जण होते... गायक कमाल खान, सलमान खान आणि बॉडीगार्ड रवींद्र पाटील. यामुळेही अशोक सिंहची साक्ष संशयाच्या फेऱ्यात आली. दरम्यान, आरोपीच्या वकीलांनी पोलिसांनी स्टीरिंग व्हीलवरून बोटांचे ठसे उचलले नव्हते, हा युक्तीवाद केला. मात्र न्यायाधीशांनी याला जास्त महत्त्व दिलं नाही.
तिसरा प्रश्न: सलमाननं सांगितलं की त्यानं मद्य नाही पाणी पिलं होतं. मात्र मेडिकल टेस्टमध्ये त्यानं मद्यप्राशन केलं असल्याचं सिद्ध झालं होतं. सरकारी वकीलांनी आरोप केला होता की, सलमाननं बकार्डी प्राशन केली होती. पिण्याच्या प्रकरणात लॅब अॅनॅलायझरची साक्ष जास्त महत्त्वाची होती. ज्यानं सलमानच्या रक्ताची चाचणी केली होती आणि मर्यादेपेक्षा जास्त मद्यप्राशन केलं असल्याचं निष्पन्न केलं होतं.
चौथा प्रश्न: सलमानवर हा आरोप होता की, तो ड्रायव्हिंग लायसंस विना गाडी चालवत होता आणि आरटीओ रेकॉर्ड्सवरून ही बाब स्पष्टही झाली. सलमानकडून याबाबत 2004चं ड्रायव्हिंग लायसंस सादर केलं गेल. मात्र आरटीओच्या रेकॉर्डमध्ये त्याची नोंद नव्हती.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.