हॉलिवूड अभिनेत्री किम कर्दाशियन बंदुकीच्या धाकावर ठेवलं ओलिस

हॉलिवूड अभिनेत्री किम कार्दशियन हिला पॅरीसमधील एका हॉटेलमध्ये बंधक बनवलं गेल्याचं सोशल नेटवर्कवर माहिती आली. किम पॅरीस फॅशन वीकमध्ये भाग घेण्यासाठी आई क्रिस जेनर आणि बहिण कोर्टनी कर्दशियन-केंडेल जेनरसोबत पोहोचली होती.

Updated: Oct 3, 2016, 11:22 AM IST
हॉलिवूड अभिनेत्री किम कर्दाशियन बंदुकीच्या धाकावर ठेवलं ओलिस title=

मुंबई : हॉलिवूड अभिनेत्री किम कार्दशियन हिला पॅरीसमधील एका हॉटेलमध्ये बंधक बनवलं गेल्याचं सोशल नेटवर्कवर माहिती आली. किम पॅरीस फॅशन वीकमध्ये भाग घेण्यासाठी आई क्रिस जेनर आणि बहिण कोर्टनी कर्दशियन-केंडेल जेनरसोबत पोहोचली होती.

किमच्या स्पोकपर्सनने म्हटलं आहे की, 'रविवारी रात्री तिला पॅरीसमधील एका हॉटेलमध्ये बबंदुकीचा धाक दाखवून ओलिस ठेवण्यात आलं. दोन लोकांनी चेहऱ्यावर मास्क आणि पोलिसांचं कपडे परिधान केले होते.

'किमला कोणत्याही प्रकारचं नुकसान न झाल्याची माहिती आहे. रविवारी रात्री किमचा पती न्यूयॉर्कमधील एका कार्यक्रमात होता. जेव्हा त्यांना किम आणि तिच्या कुटुंबियांबाबत ही गोष्ट माहित पडली तेव्हा ते लगेचच त्या कार्यक्रमातून बाहेर आले. 

सीएनएनने दिलेल्या माहितीनुसार वेस्ट हा अचानक कार्यक्रमातून उठून गेल्याने सगळ्यांनाच धक्का बसला. यामागे फॅमिली इमरजन्सी असल्याचं फक्त कारण सांगण्यात आलं आहे.