'हम आपके है कौैन'चा बॉलिवूडचा हिट फॉर्म्युला

100 कोटी सिनेमाने कमावले की सिनेमा हिट झाला, हे जणू समीकरणंच तयार झालंय. मात्र, ख-या अर्थाने या 100 कोटींच्या क्लबची सुरुवात केली, ती सुरज बडजात्याच्या हम आपके है कौन या सिनेमाने.

Updated: Aug 5, 2014, 11:41 PM IST
'हम आपके है कौैन'चा बॉलिवूडचा हिट फॉर्म्युला  title=

मुंबई : 100 कोटी सिनेमाने कमावले की सिनेमा हिट झाला, हे जणू समीकरणंच तयार झालंय. मात्र, ख-या अर्थाने या 100 कोटींच्या क्लबची सुरुवात केली, ती सुरज बडजात्याच्या हम आपके है कौन या सिनेमाने.

या सिनेमाने ओवरसीज आणि भारतात जवळपास 100 कोटींची कमाई केली.. समीक्षकांनी भलेही या सिनेमाला लग्नाचा व्हिडीओ म्हटलं असलं, तरी 19 वर्षांपासून सुरु असलेला शोलेचा रेकॉर्डसुद्धा याच सिनेमाने मोडला.

सुरज बडजात्याच्या या सिनेमात हिंसा नव्हती, कोणत्याहीप्रकारे अंगप्रदर्शन नव्हतं, कोणी खलनायक नाही की खलनायिका नाही. सारं काही गुडी गुडी होतं.

एखाद दुसरा सीन वगळता कॅमेरा घरातल्या घरातच फिरलाय. मात्र, तरीही प्रेक्षकांनी सिनेमाला डोक्यावर उचलून घेतलं होतं. आजही या सिनेमाचे असंख्य चाहते आहेत. सिनेमाने नुसतेच 100 कोटी कमावले नाही तर त्याचबरोबर प्रेक्षकांचं प्रेमसुद्धा मिळवलं. 
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.