मुंबई : अभिनेता पुलकीत सम्राटने तो यामी गौतमला डेट करत असल्याच्या बातम्यांचे खंडन केले आहे. श्वेता आणि मी वेगळं होण्याच्या निर्णयाला आपणच जबाबदार असल्याचे त्यानं म्हटलंय.
श्वेताला रोहिरा सलमान खानची मानलेली बहीण आहे. २०१४ मध्ये पुलकीत आणि श्वेताचं लग्न झालं. गेल्यावर्षी पुलकीत आणि यामी गौतम जवळ आल्याच्या बातम्या आल्यानंतर त्याने आणि श्वेताने वेगळं होण्याचा निर्णय घेतला.
'मी आणि श्वेता वेगळे होण्याच्या निर्णयाला दुसऱ्या व्यक्तीला जबाबदार धरणं चुकीचं ठरेल. आम्हाला आधी वाटलं होतं की आम्ही एकमेकांचे सोलमेट्स आहोत. पण, आम्ही चुकलो होतो याची जाणीव आता आम्हाला झालीये.' असे पुलकितने सांगितलेय.
'यामी चांगली मुलगी आहे. आमच्याबद्दल असं काहीतरी बोलणं म्हणजे मूर्खपणाचं आहे. ती चांगलं काम करते आहे. आमच्यातील नातेसंबंधाच्या अफवा निरर्थक आहेत,' असे पुलकित म्हणाला. पुलकीत आणि यामीचा येत्या १२ फेब्रुवारीला 'सनम रे' हा चित्रपट प्रदर्शित होतोय. त्यात पडद्यावर ते दोघेही रोमान्स करताना दिसणार आहेत.