सल्लू मियाँनी एक्स गर्लफ्रेँड कतरिनाची मागितली माफी!

सलमान खान बॉलिवूडमध्ये आपल्या दबंग अंदाजासाठी ओळखल्या जातो. मात्र जेव्हा तो मस्तीच्या मूडमध्ये असतो तेव्हा आपल्या मित्रांची चांगलीच खेचतो. नुकतंच लाडकी बहिण अर्पिताच्या लग्नात सलमाननं कतरिना कैफची चांगलीच ‘टांग खेचली’ होती. पण सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार सलमाननं आपल्या अशा वागण्याची कतरिनाकडे क्षमा मागितलीय. 

Updated: Nov 29, 2014, 09:16 AM IST
सल्लू मियाँनी एक्स गर्लफ्रेँड कतरिनाची मागितली माफी! title=

मुंबई: सलमान खान बॉलिवूडमध्ये आपल्या दबंग अंदाजासाठी ओळखल्या जातो. मात्र जेव्हा तो मस्तीच्या मूडमध्ये असतो तेव्हा आपल्या मित्रांची चांगलीच खेचतो. नुकतंच लाडकी बहिण अर्पिताच्या लग्नात सलमाननं कतरिना कैफची चांगलीच ‘टांग खेचली’ होती. पण सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार सलमाननं आपल्या अशा वागण्याची कतरिनाकडे क्षमा मागितलीय. 

काय घडलं होतं तेव्हा…

अर्पिताच्या लग्नात कार्यक्रमादरम्यान, जेव्हा ‘अग्निपथ’ चित्रपटातलं चिकनी चमेली गाणं सुरू झालं. तेव्हा सलमाननं माइक हातात घेऊन ‘कतरिना कैफ, कतरिना कैफ तुझं गाणं वाजतंय, प्लीज स्टेज वर ये’, अशी हाक मारली. पण कतरिना करण जोहरच्या मागे लपण्याचा प्रयत्न करत होतं. सलमाननं मग करण जोहरलाच आवाज देत, ‘करण प्लीज इकडे ये आणि सोबत कतरिनाला स्टेजवर आण’ म्हटलं. 

जेव्हा कतरिनानं येण्यास नकार दिला, तेव्हा सलमाननं म्हटलं, “बरं ठीक आहे, कतरिना कैफ नाही, कतरिना कैफ कपूर प्लीज स्टेजवर ये.” अखेर कतरिना जेव्हा स्टेजवर आली तेव्हा सलमाननं गमतीत म्हटलं, “मी काय करू, मी तुला कतरिना खान बनण्याची संधी दिली होती, पण तुला ‘कतरिना कपूर’ व्हायचं होतं.”

या संपूर्ण घटनेवर कतरिनानं काहीच रिएक्शन दिली नव्हती. मात्र बातमी आहे की, कॅट सलमानच्या या व्यवहारावर खूप नाराज होती. त्यामुळं आयुष-अर्पिताच्या रिसेप्शनला ती आली नाही.
आता अशी माहिती मिळतेय की, सलमान खाननं स्वत: कतरिना कैफच्या घरी जावून तिची माफी मागितलीय आणि सर्व काही विसरायला म्हटलंय. त्यांच्यातले मतभेद, गैरसमजही दूर झाल्याचं कळतंय. 
 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.