मलाच 'शुद्धी'मधून 'किक' मारण्यात आली - सलमान

बॉलिवूडचा दबंग खान पुन्हा एकदा वादग्रस्त वक्तव्य केल्यानं चर्चेत आलाय. 

Updated: Jun 20, 2015, 05:42 PM IST
मलाच 'शुद्धी'मधून 'किक' मारण्यात आली - सलमान  title=

मुंबई : बॉलिवूडचा दबंग खान पुन्हा एकदा वादग्रस्त वक्तव्य केल्यानं चर्चेत आलाय. 

करण जोहरचा महत्त्वकांक्षी सिनेमा असलेल्या 'शुद्धी'बद्दल बोलताना आपण सिनेमा सोडला नाही तर आपल्यालाच त्या सिनेमातून 'किक' मारण्यात आल्याचं सलमाननं म्हटलंय.

या सिनेमात सर्वात प्रथम ऋतिक रोशन आणि करीना कपूर यांना घेण्यात आलं होतं. पण, ऋतिकनं हा सिनेमा करायला काही कारणानं नकार दिला आणि त्यानंतर करीनाही या प्रोजेक्टमधून बाहेर पडली. 

याबद्दल बोलताना सलमाननं, मी जेव्हा करीनाला याबद्दल विचारलं तेव्हा तीनं म्हटलं की, ऋतिक होता म्हणून मी या सिनेमाला होकार दिला होता. पण, जेव्हा त्यानंच हा सिनेमा सोडला म्हणून मग मीही सिनेमात काम करायला नकार दिला. 

त्यानंतर, हा सिनेमा सलमानला ऑफर करण्यात आला होता. पण, सलमानला 'किक' मारून आता करण जोहरनं त्याचे 'स्टुडंट ऑफ द इअर' वरुण धवन आणि आलिया भट्ट यांना कास्ट केलंय. 

सलमान सध्या त्याच्या आगामी 'बजरंगी भाईजान'च्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. सलमानचा हा सिनेमा ईदच्या मुहूर्तावर प्रदर्शित होणार आहे. 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.