'इंडियन आयडॉल' फेम राहुल वैद्य पुन्हा एकदा प्रेक्षकांसमोर

'इंडियन आयडॉल'च्या पहिल्या भागात विजेता ठरला तो मराठमोळा अभिजित सावंत... पण, याच कार्यक्रमात थोडक्यासाठी मागे पडलेला राहुल वैद्य आजही बऱ्याच जणांच्या लक्षात आहे... तो केवळ त्याच्या आवाजासाठी आणि परफॉर्मन्ससाठी...

Updated: Sep 8, 2015, 06:04 PM IST
'इंडियन आयडॉल' फेम राहुल वैद्य पुन्हा एकदा प्रेक्षकांसमोर title=

मुंबई : 'इंडियन आयडॉल'च्या पहिल्या भागात विजेता ठरला तो मराठमोळा अभिजित सावंत... पण, याच कार्यक्रमात थोडक्यासाठी मागे पडलेला राहुल वैद्य आजही बऱ्याच जणांच्या लक्षात आहे... तो केवळ त्याच्या आवाजासाठी आणि परफॉर्मन्ससाठी...

मुळचा नागपूरचा असलेला राहुलचं नुकतंच एक गाणं प्रसिद्ध करण्यात आलंय. अभिषेक बच्चन आणि असिन यांच्यावर चित्रीत करण्यात आलेलं हे गाणं बऱ्याच प्रेक्षकांचं लक्ष वेधून घेतंय.

'बातों को तेरी' या गाण्यातून राहुलनं पुन्हा एकदा दमदारपणे प्रेक्षकांसमोर एन्ट्री घेतलीय. त्याचं हे गाणं प्रेक्षकांच्या पसंतीसही उतरतंय. 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.