शाहरुख-हृतिक पुन्हा आमने-सामने

शाहरुख खानचा रईस आणि हृतिक रोशनचा काबील हे जानेवारी 2017 मध्ये एकाच वेळी रिलीज होणार आहेत. 

Updated: Sep 16, 2016, 09:22 AM IST
शाहरुख-हृतिक पुन्हा आमने-सामने title=

मुंबई : शाहरुख खानचा रईस आणि हृतिक रोशनचा काबील हे जानेवारी 2017 मध्ये एकाच वेळी रिलीज होणार आहेत. त्यामुळे या दोन चित्रपटांमध्ये शाहरुख का हृतिक बाजी मारणार याची उत्सुकता ताणली गेली असतानाच 2018मध्ये हे दोन्ही दिग्गजांमध्ये पुन्हा लढाई होणार आहे. 

हृतिकचा क्रिश-4 हा 2018 च्या ख्रिसमसमध्ये रिलीज होणार आहे. तर शाहरुखच्या आनंद एल राय यांच्याबरोबरच्या चित्रपटाचं नाव ठरलं नसलं तरी हा चित्रपटही 2018च्या ख्रिसमसमध्येच रिलीज होणार आहे.