ऐश्वर्याच्या बोल्ड सीन्सवर भडकल्या जया बच्चन

बॉलीवूडची वादग्रस्त ठरलेला सिनेमा ऐ दिल है मुश्किल येत्या २८ ऑक्टोबरला प्रदर्शित होतोय. या सिनेमात पाकिस्तानी कलाकाराच्या सहभागामुळे वादंग उठला असतानाच रणबीर आणि ऐश्वर्याच्या जबरदस्त केमिस्ट्रीचीही चांगली चर्चा होतेय. 

Updated: Oct 28, 2016, 08:20 AM IST
ऐश्वर्याच्या बोल्ड सीन्सवर भडकल्या जया बच्चन

मुंबई : बॉलीवूडची वादग्रस्त ठरलेला सिनेमा ऐ दिल है मुश्किल येत्या २८ ऑक्टोबरला प्रदर्शित होतोय. या सिनेमात पाकिस्तानी कलाकाराच्या सहभागामुळे वादंग उठला असतानाच रणबीर आणि ऐश्वर्याच्या जबरदस्त केमिस्ट्रीचीही चांगली चर्चा होतेय.

या सिनेमात रणबीर आणि ऐश्वर्या यांचे बोल्ड सीन्स आहेत. यावरुन नाराज झालेल्या अभिनेत्री जया बच्चन यांनी नाव न घेता ऐश्वर्यावर निशाणा साधलाय.

'हल्लीच्या सिनेमांमध्ये वेस्टर्न कल्चरचा प्रभाव वाढत आहे. मला नाही माहीत असे का आहे. आधीच्या सिनेमांममध्ये खलनायिका आणि नायिका असतं. मात्र आता खलनायिकांची गरजच भासत नाही. आताच्या नायिका लहान कपडे घालतात आणि नाचतात. बॉलीवूडने पैशाशी लग्न केलेय,' असे त्या म्हणाल्या.