मुंबई : दक्षिणातील मेगास्टार चिरंजीवीचा तेलगू सिनेमा कैदी नंबर १५० ने १६४ कोटींची कमाई केली आहे. निर्मात्यांनी याची घोषणा केली.
अभिनेते चिरंजीवीचा 'कैदी नंबर 150' हा बुधवारी रिलीज झाला होता. हा एक तमिळ ब्लॉकबस्टर सिनेमा 'कथ्थी'चा तेलगू रिमेक आहे. या सिनेमासाठी अनेक कंपन्यांनी सुट्टी घोषित केली होती. मस्कटच्या अल रियाद कंस्ट्रक्शन आणि ट्रेडिंग एलएलसी कंपनीने देखील तेलगु फिल्म इंडस्ट्रीमध्ये 'बादशाहों का बादशाह' घोषित करत ११ जानेवारी सुट्टीची घोषणा केली होती.
या सिनेमाने साऊथच्या अनेक सिनेमांचे रेकॉर्ड तोडले आहेत. वी.वी विनायक यांच्या दिग्दर्शन असलेल्या या सिनेमात काजल अग्रवाल आणि तरुण अरोडाने देखील भूमिका साकारली आहे. हा सिनेमा जगभरात २००० स्क्रीन्सवर रिलीज झाला.