...तर काजोल अजय देवगणची नव्हे तर शाहरुखची पत्नी असती

बॉलीवूड अभिनेता शाहरुख खान आणि काजोल यांच्यात मैत्री सर्वांनाच परिचयाची आहे. ही मैत्री बाजीगरपासून कायम आहे. रील आणि रीयल या दोन्ही लाईफमध्ये त्यांच्यात गजब केमिस्ट्री पाहायला मिळते. 

Updated: Aug 5, 2016, 01:35 PM IST
...तर काजोल अजय देवगणची नव्हे तर शाहरुखची पत्नी असती title=

मुंबई : बॉलीवूड अभिनेता शाहरुख खान आणि काजोल यांच्यात मैत्री सर्वांनाच परिचयाची आहे. ही मैत्री बाजीगरपासून कायम आहे. रील आणि रीयल या दोन्ही लाईफमध्ये त्यांच्यात गजब केमिस्ट्री पाहायला मिळते. 

गेल्या वर्षी दिलवाले या चित्रपटातून काजोल आणि शाहरुखची एव्हरग्रीन केमिस्ट्री आपल्याला पाहायला मिळाली होती. काजोल आणि शाहरुख या जोडीने बॉलीवूडमधील अनेक हिट चित्रपट दिले. बाजीगर नंतर दिलवाले दुल्हनिया ले जाएंगे, करण-अर्जुन, कुछ कुछ होता है या चित्रपटांचा यात समावेश आहे. 

शाहरुखला करायचे होते काजोलशी लग्न

शाहरुख आणि काजोल यांच्यात चांगली मैत्री आहे. ही मैत्री बाजीगरपासून सुरु असून ती आजतायगत कायम आहे. शाहरुखने एकदा मुलाखतीदरम्यान, जर माझे लग्न झाले नसते तर मी काजोलशी लग्न केले असते. त्यामुळे जर शाहरुखने लग्नाचा प्रस्ताव ठेवला असता तर काजोलने नक्कीच नकार दिला नसता. मात्र काजोलच्या लग्नानंतरही त्यांच्यातील मैत्रीत काही फरक पडलेला नाहीये.