कपिल आणि गुत्थी पुन्हा परत येणार

कपिल शर्माच्या कॉमेडी नाईट्स विथ कपिल हा शो बंद झाल्याने त्याचे अनेक चाहते नाराज झालेत. या चाहत्यांसाठी आनंदाची बातमी आहे. 

Updated: Feb 3, 2016, 03:15 PM IST
कपिल आणि गुत्थी पुन्हा परत येणार title=

मुंबई : कपिल शर्माच्या कॉमेडी नाईट्स विथ कपिल हा शो बंद झाल्याने त्याचे अनेक चाहते नाराज झालेत. या चाहत्यांसाठी आनंदाची बातमी आहे. 

कपिल शर्मा आणि गुत्थी म्हणजेच सुनील ग्रोव्हर एका नव्या शोद्वारे पुन्हा तुम्हाला हसवण्यासाठी परत येतायत. एका वेबसाईटने दिलेल्या माहितीनुसार, कॉमेडी स्टाईल असं या शोचं नाव असणार आहे. तसेच लवकरच हा शो सोनी टीव्हीवर प्रसारित होणार आहे. 

गुत्थीने फेसबुकवरुन ही आनंदाची बातमी दिलीय. see you soon असं फेसबुकवर त्यानं म्हटलंय. तसेच ट्विटरवरुन त्याने ही बातमी दिलीय. "I want to wear make up soon. See you soon. Before monsoon." असं त्यानं ट्विट केलंय. 

काही दिवसांपूर्वी चॅनेलसोबतच्या मतभेदामुळे कपिलचा कॉमेडी नाईट्स विथ कपिल हा शो बंद झाला. त्याच्या जागी कृष्णा अभिषेकचा नवा शो सुरु करण्यात आलाय.