मुंबई : करण जोहर अविवाहीत आहे असं त्याच्या चाहत्यांना जरी वाटत असलं तरी त्याला स्वतःला मात्र असं वाटत नाही. चाहत्यांना ही गोष्ट स्वीकारणं कठीण जाईल कदाचित पण करण विवाहीत आहे.
न्यूज एजन्सी पीटीआयला दिलेल्या मुलाखतीत करणने आपल्या लग्नाची माहीती दिली. “मी दोन जणांशी लग्न केलं आहे. ते म्हणजे फिल्म आणि टीव्ही. दोन्ही गोष्टी माझ्यासाठी सारख्याच महत्त्वाच्या आहेत”असं त्याने मुलाखतीत महटलंय.
करण आपल्या कार्यक्रमाचा टीआरपी दर गुरूवारी बघतो. कमी असल्यास तो का कमी आहे याचं कारण तो आपल्या टीमला शोधायला सांगतो. तो जेव्हा एखादं काम हाती घेतो तेव्हा ते चांगलं होतंय की नाही याची सतत खात्री करून घेत असतो.
बऱ्याच वर्षांपूर्वी 'कुछ कुछ होता है' या सिनेमाच्या माध्यमातून करणने दिग्दर्शक म्हणून सुरूवात केली होती. सध्या तो झलक दिखला जा या कार्यक्रमात परीक्षक म्हणून काम करत आहे.