जयपूर : जयपूर लिटरेचर फेस्टिव्हलमध्ये निर्माता-दिग्दर्शक करण जोहरनं वादग्रस्त वक्तव्य केलंय. त्यामुळे, तो वादात अडकण्याची चिन्ह आहेत.
फेस्टिव्हलच्या भागात करण जोहर अभिव्यक्ती स्वातंत्र्याबद्दल भाष्य करत होता. आपल्या जीवनावर आधारित लेखिका पूनम सक्सेना यांच्याद्वारे लिहिलेलं पुस्तक 'अॅन अनसुटेबल बॉय'वर चर्चा सुरु होती. याच दरम्यान करणनं आपली हळहळ व्यक्त केलीय.
आपल्या देशात बोलण्याचं स्वातंत्र्य नाही. इथं व्यक्तीगत चर्चेवरही तुरुंगात धाडण्यात येतं. तुम्ही कुणाच्याही व्यक्तिगत जीवनावर काही बोलू शकत नाहीत. खाजगी वक्तव्यावरही शिक्षा होऊ शकते. 'फ्रिडम ऑफ एक्सप्रेशन' म्हणजे मोठ्ठा जोक झालाय, असं वक्तव्य करणनं यावेळी केलंय.
जयपूर फेस्टिव्हलमध्ये देश-विदेशांतील प्रसिद्ध साहित्यकार लेखक, सिनेमा आणि राजकारणाशी निगडीत अनेक हस्ती सहभाग नोंदवणार आहेत.