करीनाचा झिरो फिगर आणि झिरो जीके…

भारताच्या 'मंगळयान' मोहिमेच्या यशाची संपूर्ण जगात चर्चा होतेय. अमिताभ बच्चन, रितेश देशमुख आणि अभिषेक बच्चन यांसारख्या अनेक बॉलिवूड स्टार्सनंही या भारताच्या या यशाचं कौतुक केलंय. पण, 'मंगळयान' मोहमेचा गंधही नसलेलेही काही लोक आहेत... त्यापैंकीच एक आहे बेगम करीना कपूर खान...

Updated: Sep 27, 2014, 07:46 PM IST
करीनाचा झिरो फिगर आणि झिरो जीके… title=

मुंबई : भारताच्या 'मंगळयान' मोहिमेच्या यशाची संपूर्ण जगात चर्चा होतेय. अमिताभ बच्चन, रितेश देशमुख आणि अभिषेक बच्चन यांसारख्या अनेक बॉलिवूड स्टार्सनंही या भारताच्या या यशाचं कौतुक केलंय. पण, 'मंगळयान' मोहमेचा गंधही नसलेलेही काही लोक आहेत... त्यापैंकीच एक आहे बेगम करीना कपूर खान...

करीनाला 'मंगळयान' म्हणजे काय? हेही माहीत नसल्याचं नुकत्याच एका कार्यक्रमात समोर आलं. ‘मंगळ मोहिमेबद्दल काय सांगशील?’ असा प्रश्न एका पत्रकारानं करीनाला केला होता.

त्यावर करीनाच्या चेहऱ्यावरील प्रश्नार्थक हावाभावा व्यतिरिक्त तिच्याकडे उत्तरादाखल काहीही नव्हतं. सुरुवातीला तर तिला हा प्रश्नच कळला नाही. तिने हाच प्रश्न इंग्रजीत विचारायला सांगितला. मग, त्या पत्रकारानं तिला हाच प्रश्न इंग्रजीत विचारला... पण, तिच्या चेहऱ्यावरचं प्रश्नचिन्ह कायम...

यावर काय बोलावं, हेच तिला पहिल्यांदा कळलं नाही... काही वेळ ती समोरच्या लोकांकडे फक्त पाहत राहिली. त्यानंतर, 'बडा साइंटिफिक सवाल है' असं म्हणत तिनं वेळ टाळण्याचा प्रयत्न केला.

त्यानंतर उपस्थितांनी तिला ‘आपल्या देशाने स्पेस टेक्नोलॉजिच्या क्षेत्रात महत्त्वाचे पाऊल टाकले आहे. म्हणजे, आज आपण मंगळ ग्रहवर पोहचलोय...’ असं समजावून सांगितलं.

मग, बेगम साहेबांनी ‘आपल्या देशासाठी ही खूप महत्वाचा दिवस आहे. मला स्वतःला स्पेसवर जाण्याची इच्छा आहे’ असं म्हणत स्वतःला वाचविण्याचा प्रयत्न केला.

एव्हाना, करिनाचा 'झिरो फिगरबरोबर जीकेसुद्धा झिरो' असल्याचं लोकांना कळून चुकलं होतं. यावेळी, करिनानं बॉलिवूडच्या लेटेस्ट 'जीके जीनियस' असलेल्या आलिया भट्ट हिलादेखील मागे टाकून प्रथम क्रमांक मिळविलाय. महत्त्वाचं म्हणजे, आलिया करीनाला आपला आयकॉन मानते. खरंच असावं...

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.