करिना म्हणतेय, 'जेव्हापर्यंत जिवंत आहे तेव्हापर्यंत...'

आपला आगामी सिनेमा 'की अॅन्ड का'च्या प्रमोशनसाठी करिना कपूर खान बिझी आहे. या दरम्यान तिनं आजीवन सिनेमांमध्ये काम करून पैसे कमावणार असल्याचं म्हटलंय. 

Updated: Mar 11, 2016, 03:30 PM IST
करिना म्हणतेय, 'जेव्हापर्यंत जिवंत आहे तेव्हापर्यंत...' title=

मुंबई : आपला आगामी सिनेमा 'की अॅन्ड का'च्या प्रमोशनसाठी करिना कपूर खान बिझी आहे. या दरम्यान तिनं आजीवन सिनेमांमध्ये काम करून पैसे कमावणार असल्याचं म्हटलंय. 

जेव्हा मी अविवाहीत होते तेव्हाही मी काम करत होते. आता माझं लग्न झालंय आणि मी कुणाची तरी पत्नी आहे, तरीही मी काम करतेय आणि आपले पैसे मिळवतेय. यासाठी माझा नवराही मला सपोर्ट करतोय. उद्या मी आई बनू शकते तेव्हाही मी काम करणार आणि पैसे मिळवणार आणि तेव्हाही माझा पती माझ्यासोबत असेल... मी जेव्हापर्यंत जिवंत आहे तेव्हापर्यंत पैसे कमावणार, असं करिनानं म्हटलंय. 

 
'की अॅन्ड का'मध्ये करिना कपूर एका प्रोफेशनल महिलेच्या भूमिकेत आहे... तर तिचा पती (अर्जुन कपूर) पूर्णवेळ घर सांभाळून हाऊस हसबन्डची भूमिका निभावतोय. 

अर्जुन आणि करिनाचं एक प्रमोशन...