संजयच्या लग्नानंतर करिश्माही देणार आनंदाची बातमी...

नुकतंच अभिनेत्री करिश्मा कपूर हिचा एकेकाळचा पती संजय कपूर यानं आपल्या गर्लफ्रेंड प्रिया सचदेव हिच्याशी विवाह केल्याची बातमी आली. यानंतर आता करिश्माही लवकरच पुन्हा एकदा विवाहबंदनात अडकणार असल्याचं समजतंय. 

Updated: Apr 15, 2017, 05:17 PM IST
संजयच्या लग्नानंतर करिश्माही देणार आनंदाची बातमी...

मुंबई : नुकतंच अभिनेत्री करिश्मा कपूर हिचा एकेकाळचा पती संजय कपूर यानं आपल्या गर्लफ्रेंड प्रिया सचदेव हिच्याशी विवाह केल्याची बातमी आली. यानंतर आता करिश्माही लवकरच पुन्हा एकदा विवाहबंदनात अडकणार असल्याचं समजतंय. 

करिश्माचा बॉयफ्रेंड संदीप तोष्नीवाल याच्या घटस्फोटाचं प्रकरण आता संपुष्टात येतंय असं दिसतंय. 'स्पॉटबॉय'नं दिलेल्या बातमीनुसार, संदीपची पत्नी डॉ. अश्रिता हिनं संदीपला घटस्फोट देण्यासाठी होकार दिलाय. 

घटस्फोटासाठी संदीप अश्रिताला दोन करोड आणि दोन्ही मुलींसाठी 3-3 करोड रुपये पोटगी म्हणून देणार आहे. दोन्ही मुलींची कस्टडी अश्रिताकडेच राहणार आहे. याशिवाय, अश्रितानं संदीपकडून 8 लाख रुपये प्रत्येक महिन्याचा भत्ता मागितला आहे. दिल्लीमध्ये राहण्यासाठी एका फ्लॅटचीही अश्रितानं मागणी केलीय. 

योगायोग म्हणजे, अश्रिता - संदीपचा 2003 साली विवाह झाला होता.... याच वर्षी करिश्मानं संजयशी विवाह केला होता... या दोघांचा 2016 साली घटस्फोट झालाय.