मुंबई : कतरिना कैफ हिच्यासोबत 'जब तक है जान' या चित्रपटात काम केलेल्या अभिनेत्री अनुष्का शर्मा हिची 'कॅट' फेव्हरेट बनलीय. कतरिना ही माझी आवडती सह-अभिनेत्री असल्याचं अनुष्का सांगतेय.
अभिनेत्रींमध्ये नंबर वन पदासाठी कथित स्पर्धेत अनुष्काला अजिबात रस नाही. अनुष्काच्या मते, 'अभिनेत्री असल्यानं आपल्यातली कॅट फाईट संपवण्याची गरज आहे... मी क्वीन पाहिल्यानंतर कंगना रानौतला आणि कॉकटेल पाहिल्यानंतर दीपिका पादूकोणला फोन करून अभिनंदन केलं होतं. मी त्यांचे सिनेमे पाहिल्यानंतर खूप जास्त उत्साही होते'
'कतरिना माझी आवडती सह-अभिनेत्री आहे कारण माझं तिच्याशी खूप प्रेमळ नातं आहे. ती खूप खरी व्यक्ती आहे.... तिच्यात दिखावूबाजपणा नाही. मला जब तक है जान या चित्रपटात तिच्यासोबत काम करायला खूप मजा आली. मला माहीत आहे की तीही माझ्यासाठी खूप खूश असते' असं अनुष्कानं म्हटलंय.
अनुष्का सध्या नुकत्याच प्रदर्शित झालेल्या 'पीके' या सिनेमाचं यश एन्जॉय करतेय.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.