'फितूर'च्या शुटिंगमध्ये कतरिना जखमी

 बॉलिवूडची आघाडीची अभिनेत्री कतरिना कैफ तिचा आगामी चित्रपट 'फितूर'च्या शुटिंगवेळी जखमी झाली. कतरिनाला मानेला आणि पायाला जखम झाली आहे. 

Updated: Apr 21, 2015, 07:38 PM IST
'फितूर'च्या शुटिंगमध्ये कतरिना जखमी

मुंबई :  बॉलिवूडची आघाडीची अभिनेत्री कतरिना कैफ तिचा आगामी चित्रपट 'फितूर'च्या शुटिंगवेळी जखमी झाली. कतरिनाला मानेला आणि पायाला जखम झाली आहे. 

एका इंग्रजी दैनिकाने दिलेल्या वृत्तानुसार गेल्या शुक्रवारी दिल्लीमध्ये 'फितूर'चे शुटिंग सुरू असताना घोडा चालविताना कतरिनाच्या मानेला आणि पायाला किरकोळ जखम झाली. पण दुखती जखमेसह तिने आपले शुटिंग पूर्ण केले. नंतर डायरेक्टर अभिषेक कपूरने कतरिनाला आरामा करण्यास सांगितले. 

डायरेक्टर अभिषेक कपूर यांनी याबद्दल सांगितले की, 'कतरिना खूप मेहनती अभिनेत्री आहे. त्याच्या प्रोफेशनलिझमबाबत ऐकले होते. पण आता अनुभवही घेतला. 

'फितूर' मध्ये कतरिना कैफ आणि आदित्य रॉय कपूर दिसणार आहे. तसेच या चित्रपटात सदाबहार अभिनेत्री रेखा प्रमुख भूमिकेत दिसणार आहेत. 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.