'कट्यार काळजात घुसली'चा ट्रेलर लॉन्च, काळजाला भिडणारा चित्रपट

'सूर निरागस हो' हे फिल्म रिलीजपूर्वीच जबरदस्त हिट झालेलं गाणं 'कट्यार काळजात घुसली' या चित्रपटातील आहे. अभिनयात पहिलं पाऊल टाकणाऱ्या शंकर महादेवन यांनी चित्रपटात पंडितजींची भूमिका साकारलीय. चित्रपटाचा ट्रेलर लॉन्च झालाय. 

Updated: Oct 21, 2015, 06:43 PM IST
'कट्यार काळजात घुसली'चा ट्रेलर लॉन्च, काळजाला भिडणारा चित्रपट  title=

मुंबई: 'सूर निरागस हो' हे फिल्म रिलीजपूर्वीच जबरदस्त हिट झालेलं गाणं 'कट्यार काळजात घुसली' या चित्रपटातील आहे. अभिनयात पहिलं पाऊल टाकणाऱ्या शंकर महादेवन यांनी चित्रपटात पंडितजींची भूमिका साकारलीय. चित्रपटाचा ट्रेलर लॉन्च झालाय. 

आणखी वाचा - शंकर महादेवनचं 'सूर निरागस हो' हिट, अवघं बॉलिवूड पडलं प्रेमात

यापूर्वी 'कट्यार काळजात घुसली' या सिनेमाचं म्युझिक लॉन्च मुंबईत एका दिमाखदार सोहळ्यात पार पडलं. शंकर-एहसान-लॉय या बॉलिवूडची सिनेइंडस्ट्री गाजवणाऱ्या त्रिकुटानं 'कट्यार काळजात घुसली'ला संगीताचा साज चढवलाय.

आणखी वाचा - 'कट्यार काळजात घुसली' चित्रपटातील 'दिल की तपीश'

तर अभिनेता सुबोध भावेनं या सिनेमाचं दिग्दर्शन करत एक नवा श्रीगणेशा केलाय. शंकर महादेवन यांच्यासह सुबोध भावे, सचिन पि्ळगावकर, अमृता खानविलकर, मृण्मयी देशपांडे यांच्या अभिनयाची जुगलबंदी यात पहायला मिळणार आहे.

आणखी वाचा - खाँ साहेबांची भूमिका करिअरचा 'टर्निंग पॉईंट' - सचिन पिळगावकर

पाहा ट्रेलर -

 

चित्रपटाचं म्यूझिक लॉन्च -

 

 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.