'कट्यार'ला दाद टाळ्यांची नाही तर डोळ्यांची...

सचिन पिळगावकर, सुबोध भावे आणि शंकर महादेवन स्टार चित्रपट 'कट्यार काळजात घुसली'ला प्रेक्षकांच्या टाळ्यांची नाही तर डोळ्यांची दाद मिळत आहे. चित्रपट इतका सुंदर झाला आहे की प्रेक्षक चित्रपट संपल्यावर स्तब्ध होतो आणि नकळत त्याच्या डोळ्याचा कडा पाणावतात... 

Updated: Nov 13, 2015, 08:03 PM IST
'कट्यार'ला दाद टाळ्यांची नाही तर डोळ्यांची...  title=

मुंबई : सचिन पिळगावकर, सुबोध भावे आणि शंकर महादेवन स्टार चित्रपट 'कट्यार काळजात घुसली'ला प्रेक्षकांच्या टाळ्यांची नाही तर डोळ्यांची दाद मिळत आहे. चित्रपट इतका सुंदर झाला आहे की प्रेक्षक चित्रपट संपल्यावर स्तब्ध होतो आणि नकळत त्याच्या डोळ्याचा कडा पाणावतात... 

पंडितजींना दाद टाळ्यांची नाही तर डोळ्यांची...
चित्रपटात स्पर्धेवेळी खाँसाहेब (सचिन पिळगावकर) यांचे सुरूवातीला गाणे होते. त्याला प्रेक्षकांची भरभरून दाद मिळते. टाळ्यांचा कडकडाट होतो. सर्व जण खूश होतात. त्यानंतर पंडितजी (शंकर महादेवन) यांचे गाणे होते. त्यानंतर कोणी काहीच बोलत नाही. सर्वत्र शांतता पसरते.....

यानंतर निकालाची वेळ येत तेव्हा राजा निकाल देताना सांगतो की, हा निकाल मी देईल तो खरा असणार आहे. त्यानंतर राजा सांगतो की खाँ साहेबांच्या गाण्याला टाळ्यांची दाद मिळाली. त्यावरून मी त्यांना विजयी करणार नाही. पण पंडितजी यांच्या गाण्याने सर्वांचे डोळे पाणावले, त्यामुळे प्रत्येकवेळी दाद ही टाळ्यांपेक्षा डोळ्यांची महत्त्वाची असते. त्यामुळे पंडितजींना विजयी घोषीत करण्यात येते आणि कट्यार त्यांना मिळते. 

योगायोग

असा अनुभव चित्रपट प्रेक्षकांना चित्रपट पाहिल्यावर आला. अनेक जण नॉस्टॅलजिक झाले, आपला काळ आठवला. या कलाकृतीच्या प्रेमात पडले आणि स्तब्ध झाले. चित्रपट संपल्यावर त्यांनी टाळ्या वाजविल्या नाही, तर ते उभे राहिले अनेकांच्या डोळ्यांच्या कडा पाणावल्या होत्या. 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.