धोनीचा प्रवास : टीसी ते भारताचा कर्णधार

भारताचा वनडे कर्णधार महेंद्रसिंग धोनी यांच्या जीवनावर आधारित धोनी दी अनटोल्ड स्टोरी या सिनेमाचा ऑफिशियल ट्रेलर रिलीज झालाय.

Updated: Aug 12, 2016, 10:28 AM IST
धोनीचा प्रवास : टीसी ते भारताचा कर्णधार  title=

मुंबई : भारताचा वनडे कर्णधार महेंद्रसिंग धोनी यांच्या जीवनावर आधारित धोनी दी अनटोल्ड स्टोरी या सिनेमाचा ऑफिशियल ट्रेलर रिलीज झालाय.

रेल्वेतील टीसी ते भारतीय संघाचा कर्णधार असा धोनीचा प्रवास चित्रपटात रेखाटण्यात आलाय. वडिलांची इच्छा आपल्या मुलाने चांगली नोकरी करुन पैसे मिळवावे. मात्र धोनीच्या आयुष्याचे एकच ध्येय ते म्हणजे क्रिकेटर होणे.

तो कसा आपल्या ध्येयापर्यंत पोहोचला, या प्रवासात त्याला कोणत्या अडचणींचा सामना करावा लागला, क्रिकेटमधील राजकारण या सर्व गोष्टींवर या चित्रपटात प्रकाश टाकण्यात आलाय.